Diwali Lakshmi Pujan : लक्ष्मीपुजन करताना 'या' गोष्टी विसरू नका, देवी होईल प्रसन्न

Diwali Lakshmi Pujan
Diwali Lakshmi Pujan esakal

Diwali 2022 : दिव्यांचा दिपोत्सव साजरा करताना लक्ष्मी अन् धनाची देवता कुबेराचे मोठ्या भक्तीने पुजन केले जाते. लक्ष्मीची कृपा लाभली तर जीवनात सुख- समृद्धी सहज प्राप्त होते. आर्थिक समस्या दुर व्हावी अन् धन लाभ व्हावा यासाठी बहुतेक लोक लक्ष्मीची मनोभावे पुजा करतात. असं म्हणतात ज्याच्यावर लक्ष्मीची कृपा असते त्यांना जीवनात धन, समृद्धी, यश- किर्ती, मान-सन्मान प्राप्त होतात. लक्ष्मीपुजनला देवीची पुजा करताना जर काही गोष्टींचे आपण न विसरता पालन केले तर देवी अधिक प्रसन्न होते. चला तर लक्ष्मीपुजन वेळी काय करावे ते जाणून घेऊया.

Diwali Lakshmi Pujan
Diwali Puja 2022 : लक्ष्मी-कुबेर पुजनाचा मंत्रांसह संपूर्ण विधी, आरत्या एका क्लिकवर

झाडू पुजन

झाडू हा देवी लक्ष्मीशी संबंधीत आहे असे मानले जाते. दिवाळीनिमीत्त लक्ष्मीपुजन करताना न विसरता नविन झाडू विकत आणून त्याचे पुजन करावे. ज्योतिष शास्त्रानुसार झाडू दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. जर तुम्हाला आर्थिक अडचण सतावत असेल तर मंदिरात झाडू दान करावा.

मीठाचे पुजन करावे

मीठ हे समुद्र मंथनातून बाहेर आले आहे. आणि देवी लक्ष्मी देखील समुद्रमंथनातून बाहेर आली आहे. त्यामुळे मिठाला लक्ष्मीचा भाऊ मानले जाते. मीठ हे निसर्गाचा सार आहे. यासह दैनंदिन जीवनात मिठाचे अनमोल महत्त्व आहे, त्यामुळे लक्ष्मीपुजन करताना मीठाचे पुजन करायला विसरू नये. यातून आपण मीठाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो हाही भाव आहे.

Diwali Lakshmi Pujan
Diwali 2022 : दिवाळीत रांगोळी आणि आकाश दिव्याचे काय आहे खास महत्त्व?

नैवेद्य अर्पण करा

लक्ष्मीपुजनाला आपण जो काही नैवेद्य तयार कराल त्याचे चार भाग करा. त्यातील पहिला भाग गायीला, दुसरा भाग कुत्र्याला, तिसरा भाग कावळ्याला आणि शेवटचा भाग जेथे चार रस्ते एकत्र येतात अशा चौरस्त्यावर ठेवा. असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारच्या आर्थिक संकटातून मुक्ती मिळते.

Diwali Lakshmi Pujan
Diwali 2022 : पुराणातील या उल्लेखामुळे घुबड बनले लक्ष्मीचे वाहन, जाणून घ्या वैशिष्टे अन् महत्त्व

देवीला कमळाचे फुल अर्पण करा

लक्ष्मीला कमळाचे फुल अतिप्रिय आहे, त्यामुळे लक्ष्मीपुजन करतेवेळी कमळाचे फुल अर्पण करायला विसरू नका. यासह देवीला पिवळ्या रंगाची फुले अर्पण करा.

लक्ष्मीपुजन करते वेळी देवीला हरबऱ्याची डाळ, गुळ आपल्या मनातील इच्छा व्यक्त करुन अर्पण करावे. असे केल्याने आपल्या मनोवांचित कामना देवी पुर्ण करेल.

(माहिती विवेचन - पं. विजय राजेंद्र जोशी गुरुजी, नाशिक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com