Diwali Puja 2022 : लक्ष्मी-कुबेर पुजनाचा मंत्रांसह संपूर्ण विधी, आरत्या एका क्लिकवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali Puja 2022

Diwali Puja 2022 : लक्ष्मी-कुबेर पुजनाचा मंत्रांसह संपूर्ण विधी, आरत्या एका क्लिकवर

Diwali Puja 2022 : दिवाळी म्हणजे सर्वत्र उत्साह अन् जल्लोषाचे वातावरण निर्माण होते. सर्वांच्या आनंदाला उधाण येते. अंधकाराकडून प्रकाशाकडे जाणाऱ्या या दिपोत्सवात उत्तम आरोग्याच्या प्राप्ती साठी धनत्रयोदशी, धन-धान्य समृद्धी लाभण्यासाठी लक्ष्मी- कुबेरपुजन मोठ्या भक्ती भावाने केले जाते. या दोन्ही दिवशी पुजेसाठी गुरुजींची आवश्यकता असते. मात्र आताच्या या धावपळीच्या युगात पुजेसाठी गुरुजी मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत पुजेची मंत्रांसहित संपुर्ण माहिती. यात तुम्हाला पुजेसाठी लागणारे साहित्य, पुजेची मांडणी अन् संपुर्ण विधी जाणून घेता येणार आहे. यासह एका क्लिकवर संपुर्ण पुजा अन् आरती ऐकता येणार आहे. चला तर यंदा दिवाळी पुजेसंबंधी निश्चिंत होऊन उत्साह अन् जल्लोषात आपल्या घरी दिवाळी साजरी करुया.

(Diwali Festival 2022 Lakshmi Kuber Pujan Procedure step by step guide chanting mantras in marathi)

हेही वाचा: Dhanteras 2022 : धनत्रयोदशीला 'या' ठिकाणी लावा पणती, लक्ष्मी देवीचा लाभेल आशीर्वाद

लक्ष्मी- कुबेर पुजन

लक्ष्मी- कुबेर पुजन

संपूर्ण लक्ष्मी- कुबेर पुजन आणि आरत्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पुजेसाठी लागणारे साहित्य

तांब्याचे कलश - 2, केळीचे पान, चौरंग/ पाट- 1, लक्ष्मीची मूर्ती किंवा लक्ष्मीची व सरस्वतीचा फोटो (तसबीर), ताम्हण (पुजेसाठीचे ताट) - 3, पळी - 1, समई, नीरांजन, धूपारती, कापूरारती, समईत तेलवात, निरांजनात तूप व फुलवात, उदबत्ती (अगरबत्ती), शंख, घंटा, पंचामृत (दूध, दही, तूप, मध व साखर), रांगोळी, अत्तर, गहू/तांदूळ, शुद्ध पाणी; उगाळलेले गंध (वाटीत), हळद, कुंकू, गुलाल, सिंदूर, अष्टगंध, अक्षतांचे ताट, धने, गूळ-खोबरे, साखरफुटाणे, साळीच्या लाह्या, बत्तासे, पेढे, गुलाबपाणी (गुलाबदाणीत), विड्याची 20 पाने, सुपार्‍या - 11, नारळ - 2, लाल वस्त्रे, सुटे नाणे, पूजनासाठी योग्य पात्रात दागिने, सोने नाणे, रत्‍ने, चांदीची नाणी, हिशेबाच्या नवीन संवत्सरांच्या वह्या, दौत, टाक, लेखणी/पेन, तराजू, वजनेमापे;, दूर्वा, विविध प्रकारची फुले, फुलांच्या माळा, तोरणे, पताका.

अशी करा पुजेची मांडणी

दुकान, पेढी, कार्यालय, व्यवसायाची जागा किंवा स्वतःच्या घरी- लक्ष्मी पूजन करावे. त्या तिथीस दुपारपासूनच पूजेच्या तयारीस लागणे सोयीचे असते. पूजास्थान स्वच्छ करावे, रंग लावून, पताका, पुष्पमाळा, तोरणे, विजेची आरास करून ते सुशोभित करावे. 'लक्ष्मी' म्हणून नाणी, सोन्याचांदीचे दागिने, भांडी, पैसे यांची व्यवस्था करावी. लक्ष्मी पूजनासाठी घेतलेली नाणी वर्षभर तशीच जपून ठेवावीत, तसेच दरवर्षी यथाशक्ती त्यात भर घालून वाढ करावी. सरस्वती पूजनासाठी जमाखर्चाच्या वह्या घेऊन नववर्षासाठी त्या उपयोगात आणावयाच्या म्हणून त्यांची पूजा करण्यासाठी त्यांच्या पहिल्या पृष्ठावर कुंकुमिश्रित गंधाने स्वस्तिक रेखाटावे. संवत्सर, तिथी, महिना यांचा तेथे उल्लेख करावा.

॥शुभ॥ ॥लाभ॥ असे लाल गंधाने त्या पृष्ठावर लिहावे. शाईच्या दौती, लेखणी/पेन, तराजू, वजने, मापे पूजेसाठी ठेवावीत. पाटावर किंवा पानावर तांदूळ किंवा गहू टाकून त्यावर कलश स्थापन करावा. त्या कलशात हळद, कुंकू, गुलाल, अक्षता, फुल, रुपयाचे नाणे, सुपारी, एक नारळ असे ठेवावे. यासह पाटावर 5 पाने ठेवावी ज्यावर प्रत्येकी 1 सुपारी, खारीक, बदाम, हळकुंड ठेवावे. यावर गणपती सहित पंचायतन देवतांचे पुजन करायचे आहे.

हेही वाचा: Diwali 2022: धनत्रयोदशीला यम दिवा कोणत्या दिशेला लावावा ?

शंखपूजा

शंखपूजा

शंखपूजा

शंख असल्यास शंखाला स्नान घालून जागेवर ठेवून त्याला गंधफूल वाहावे. अक्षता वर्ज्य.

शंखात तीन पळ्या शुद्ध पाणी घालावे. पाण्यात तुलसीपत्र ठेवावे. तो देवाच्या उजव्या बाजूस ठेवावा.

ॐ शंखादौ चंद्रदैवत्यं कुक्षौ वरुणदेवता ।

पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रे गंगासरस्वती ।

त्रैलोक्ये यानि तीर्थानि वासुदेवस्य चाज्ञया ।

शंखे तिष्ठंति विप्रेन्द्र तस्मात् शंखं प्रपूजयेत् ।

त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृतः करे ।

नमितः सर्वदेवैश्च पांचजन्य नमोऽस्तु ते ।

ॐ पांचजन्याय विद्महे । पावमानाय धीमहि । तन्नः शंखः प्रचोदयात् ।

शंखदेवताभ्यो नमः । सकलपूजार्थे गंधपुष्पं तुलसीपत्रं च समर्पयामि ।

घंटापूजा

घंटेला स्नान घालून पुसून ती जागेवर ठेवून हळदकुंकू गंधाक्षता व फूल वाहावे. नंतर थोडी वाजवावी.

आगमनार्थं तु दैवानां गमनार्थं तु रक्षसाम् ।

कुर्वे घंटारवं तत्र देवताऽऽहवानलक्षणम्।

घंटायै नमः । सकलपूजार्थे हरिद्राकुंकुमं गंधाक्षतपुष्पं च समर्पयामि

दीपपूजा

समईला हळदकुंकू गंधफूल व अक्षता वाहून नमस्कार करावा.

भो दीप ब्रह्मरूपस्त्यं ज्योतिषां प्रभुरव्ययः ।

आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वार्थाश्च प्रयच्छ मे ॥

यावत्पूजासमाप्तिः स्यात्तावत् त्वं सुस्थिरो भव ।

दीपदेवताभ्यो नमः । सकलपूजार्थे हरिद्राकुंकुमं गंधाक्षतपुष्पंच समर्पयामि । नमस्करोमि ।

हेही वाचा: धनत्रयोदशीच्या दिवशी तुमचे जुने दागिने घरच्या घरी नव्यासारखे चमकवण्यासाठी या सोप्या टिप्स

गणपती पूजन

गणपती पूजन

गणपती पूजन

ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ।

ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ नः शृण्वन्नूतिभिः सीदसादनम् ॥

वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ ।

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥१॥

ॐ भूर्भुवः स्वः । श्रीमहागणपतये नमः । असिमन् पूगीफले महागणपतिं सांगं सपारिवारं सायुधं सशक्तिकं आवाहयामि ।

*आवाहन व आसन म्हणून दोन दूर्वा ठेवाव्यात व त्यावर सुपारी किंवा गणेशाची मुर्ती ठेवावी.

श्रीमहागणपतये नमः । आवाहयामि ।

श्रीमहागणपतये नमः । आसनार्थे दूर्वांकुरान् समर्पयामि ।

*फूलाने पळीत पाणी घेऊन शिंपडावे.

श्रीमहागणपतये नमः । पादयोः पाद्यं समर्पयामि

*पळीभर पाण्यात गंधाक्षता व फूल घेऊन गणेशावर वाहावे.

श्रीमहागणपतये नमः । अर्घ्यं समर्पयामि ।

*पळीत पाणी घेऊन फुलाने शिंपडावे.

श्रीमहागणपतये नमः । आचमनीयं समर्पयामि ।

पळीत पाणी घेऊन पुन्हा फुलाने शिंपडावे.

श्रीमहागणपतये नमः । स्नानं समर्पयामि ।

*जानवे किंवा तदर्थ अक्षता वाहाव्यात.

यज्ञोपवीतार्थे अक्षतान् समर्पयामि ।

*चंदनाचे कुंकुममिश्रित गंध फुलाने वाहावे.

श्रीमहागणपतये नमः । विलेपनार्थे चंदनं समर्पयामि ।

*गणेशाला अक्षता वाहाव्या.

श्रीमहागणपतये नमः । अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि ।

*श्रीगणेशांगभूत ऋद्धिसिद्धींची पूजा करताना मुर्तीला हळदकुंकू सुपारीवर वाहावे.

श्रीऋद्धिसिद्धिभ्यां नमः । हरिद्रांकुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि ।

*गणेशाला फूले वाहावीत.

श्रीमहागणपतये नमः । पूजार्थे पुष्पाणि समर्पयामि ।

*अगरबत्ती लावून ती उजव्या हाताने देवाला ओवाळावी. डाव्या हातात घंटा घेऊन त्यावेळी घंटानाद करावा.

श्रीमहागणपतये नमः । धूपं समर्पयामि ।

*नीरांजन लावून उदबत्तीप्रमाणेच ओवाळावे. त्यावेळी घंटानाद करावा.

श्रीमहागणपतये नमः । दीपं समर्पयामि ।

*देवासमोर पाण्याने लहानसा चौकोन करून त्यावर दूध किंवा जो नैवेद्य असेल तो ठेवावा. त्याभोवती पाणी परिसिंचन करावे व नैवेद्यावर दूर्वेने किंवा फुलाने पाणी शिंपडावे. प्राणाय स्वाहा इत्यादि स्वाहाकार दोनदा म्हणावेत. प्रत्येक वेळी देवाला घास भरवीत आहोत अशी क्रिया उजव्या हाताने करावी.

श्रीमहागणपतये नमः । (नैवेद्याचे नाव घ्यावे) नैवेद्यं समर्पयामि ।

ऋतं त्वा सत्येन परिषिंचामि ।

ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा । ॐ व्यानाय स्वाहा ।

ॐ उदानाय स्वाहा । ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रह्मणे स्वाहा ।

नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि । पुनर्नैवेद्यं समर्पयामि ।

उत्तरापोशनं समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि ।

* गंध फुलाने वाहावे.

करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ।

*विड्याची दोन पाने त्यावर सुपारी व दक्षिणा ठेवून त्यावर पळीभर पाणी सोडावे.

श्रीमहागणपतये नमः । मुखवासार्थे पूगीफलतांबूलं समर्पयामि ।

दक्षिणां समर्पयामि ।

*दूर्वांकुर व पुष्प वाहून नमस्कार करावा व कार्यसिद्धीसाठी प्रार्थना करावी

श्रीमहागणपतये नमः । फलार्थे नारिकेलफलं समर्पयामि ।

श्रीमहाणपतये नमः । दूर्वाकुरान् मंत्रपुष्पं च समर्पयामि । नमस्करोमि ।

कार्यं मे सिद्धिमायातु प्रसन्ने त्वयि धातरि ।

विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि सुरनायक ॥वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ ।

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

श्रीमहागणपतये नमः । निर्विघ्नं कुरु ।

अनेन कृतषोडशोपचारपूजनेन श्रीमहागणपतिः प्रीयताम् ।

अशाप्रकारे गणेशाची पुजा पुर्ण करावी.

वरुणस्थापना व पूजा

श्रीलक्ष्मीपूजनासाठी कलशाची स्थापना करावयाची असते. भारतीय संस्कृतीत कलश हे मांगल्याचे प्रतीक आहे.

कलशाला गंधअक्षत फुल वाहावे.

गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति नर्मदे सिन्धु कावेरि जलेऽस्मिन्सन्निधिं कुरु ॥

कलशाय नमः। सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ||

कलशाजवळच जमाखर्चाच्या वह्या, लेखणी, दौत, तराजू, वजने इत्यादि ठेवावे. वह्या त्यांचे पहिले पान उघडून ठेवाव्यात. लक्ष्मी-कुबेर व सरस्वतीस्वरूप म्हणून

१) चांदीचे लक्ष्मी छापाचे नाणे

२) सुवर्णादि धातूचे दागिने

३) लक्ष्मी व सरस्वती मूर्ती किंवा फोटो

४) लक्ष्मी व सरस्वती यांच्या तसबिरी ठेवाव्यात. मूर्ती किंवा नाणे ताम्हनात तांदळावर ठेवावे. दागिने पाटावर वस्त्र घालून त्यावर ठेवावेत. तसबिरी पाटावर, चौरंगावर किंवा भिंतीला टेकून ठेवाव्यात.

हेही वाचा: Dhanteras 2022 : धनतेरसच्या मुहूर्तावर राशीनुसार या वस्तूंची करा खरेदी; नशीब होईल धन-धना-धन!

श्री लक्ष्मीध्यान मंत्र

या सा पद्मासनस्था विपुलकटितटी पद्मपत्रायताक्षी ॥

गंभीरावर्तनाभिः स्तनभरनमिता शुभ्रवस्त्रोत्तरीया ॥

या लक्ष्मीर्दिव्यरूपैर्मणिगणखचितैः स्नापिता हेमकुंभैः ।

सा नित्यं पद्महस्ता मम वसतु गृहे सर्वमांगल्यमस्तु ॥

नमो दैव्ये महादेव्यै शिवायै सततं नमः ।

नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम् ॥

या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता ।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥

श्रीसरस्वतीध्यान मंत्र

नमस्ते शारदे देवि काश्मीरपुरवासिनि ।

त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे ॥

श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । ध्यानं समर्पयामि ।

हेही वाचा: Diwali facts 2022 : दिवाळीच्या या रोचक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

आवाहन -

देवीवर अक्षता वाहाव्यात.

सर्वलोकस्य जननी शूलहस्तां त्रिलोचनाम् ।

सर्वदेवमयीमीशां देवीमावाहयाम्यहम् ॥

श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्या नमः । आवाहयामि ।

आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि ।

आसन -

देवीच्या मूर्तीखाली अक्षता ठेवाव्यात.

तप्तकांचनवर्णाभं मुक्तामणिविराजितम् ।

अमलं कमलं दिव्यामासनं प्रतिगृह्यताम् ॥

श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । आसन समर्पयामि ।

आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ।

पाद्य -

पळीभर पाणी फुलाने शिंपडावे.

गंगादितीर्थसंभूत गंधपुष्पाक्षतैर्युतम् ।

पाद्यं ददाम्यहं देवि गृहाणाशु नमोऽस्तु ते ॥

श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । पादयोः पाद्यं समर्पयामि ।

हेही वाचा: Diwali Tradition : उत्तराखंडातील चामोली जिल्ह्यात चक्क नाग दिवाळी साजरी केली जाते

अर्घ्य -

पळीभर पाण्यात गंध अक्षता घालून ते फुलाने शिंपडावे.

अष्टगंधसमायुक्तं स्वर्णपात्रप्रपूरितम् ।

अर्घ्यं गृहाण मद्दत्तं महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥

श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । अर्घ्यं समर्पयामि ।

आचमन -

फूलाने पाणी शिंपडावे.

सर्वलोकस्य या शक्तिर्ब्रह्मविष्ण्वादिभिः स्तुता ।

ददाम्याचमनं तस्यै महालक्ष्म्यै मनोहरम् ॥

श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । आचमनीय़ं समर्पयामि ।

हेही वाचा: Dhanteras 2022 : धनत्रयोदशीच्या पूजेचा मुहूर्त आणि शुभ योग कोणता आहे?

पंचामृत

पंचामृत

पंचामृतस्नान -

देवीची मूर्ती असेल तर ती ताम्हनात घेउन तीवर पंचामृतातील दूध, दही, तूप, मध व साखर हे पदार्थ एकेक, पुढीलप्रमाणे वाहावेत. प्रत्येक पदार्थानंतर शुद्धोदक अर्पण करावे. तसबीर असेल तर पंचामृताचे पदार्थ फुलाने किंचित् शिंपडावेत व शुद्धोदक उजव्या हाताने ताम्हनात सोडावे.

पंचामृतसमायुक्तं जान्हविसलिलं शुभम् ।

गृहाण विश्वजननि स्नानार्थं भक्तवत्सले ॥

पयो दधि घृत चैव मधुशर्करया युतम् ।

पंचामृतेन स्नपनं क्रियतां परमेश्वरि ॥

श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः ।

* पुढील प्रत्येक मंत्राने क्रमाने प्रत्येक पदार्थ व जल अर्पण करावे.-

श्रीमहालक्ष्मै पयःस्नानं समर्पयामि । (दुध)

शुद्धोदकस्नानं समर्पयामि । (पाणी)

१) श्रीमहालक्ष्मै दधिस्नानं समर्पयामि । (दही)

शुद्धोदकस्नानं समर्पयामि । (पाणी)

३) श्रीमहालक्ष्मै घृतस्नानं समर्पयामि । (तुप)

शुद्धोदकस्नानं समर्पयामि । (पाणी)

४) श्रीमहालक्ष्मै मधुस्नानं समर्पयामि । (मध)

शुद्धोदकस्नानं समर्पयामि । (पाणी)

५) श्रीमहालक्ष्मै शर्करास्नानं समर्पयामि । (साखर)

शुद्धोदकस्नानं समर्पयामि । (पाणी)

६) श्रीमहालक्ष्मै गंधोदकस्नानं समर्पयामि । (गंध)

७) श्रीमहालक्ष्मै शुद्धोदकस्नानं समर्पयामि । (पाणी)

८) फुलाने अत्तर लावावे.

श्रीमहालक्ष्मै मांगलिकस्नानं समर्पयामि ।

९) पाणी गरम करून ते वाहावे.

श्रीमहालक्ष्मै उष्णोदकदकस्नानं समर्पयामि ।

१०) गंधफूल वाहावे.

श्रीमहालक्ष्मै सकलपूजार्थे गंधपुष्पं समर्पयामि ।

पूर्वपूजा पंचोपचार

देवीची मूर्ती पुसावी. ताम्हणातील पाणी तीर्थपात्रात काढून ठेवावे.

१) गंध लावावे.

श्रीमहालक्ष्मै विलेपनार्थे चंदनं समर्पयामि ।

२) फूल वाहावे. -

श्रीमहालक्ष्मै पूजार्थे पुष्पं समर्पयामि ।

३) धूप किंवा उदबत्ती, घंटानाद करीत ओवाळावी.

श्रीमहालक्ष्मै धूपं समर्पयामि ।

४) निरांजन, घंटानाद करीत ओवाळावे.

श्रीमहालक्ष्मै दीपं समर्पयामि ।

५) देवीला पंचामृताचा नैवेद्य दाखवावा - पाटावर पाण्याने लहानसा चौकोन करून त्यावर पंचामृताचे कचोळे ठेवावे. त्याभोवती उजव्या हाताने पाणि परिसिंचन करावे व नैवेद्यावरही फुलाने किंचित्त् पाणी शिंपडावे. प्राणाय स्वाहा । इत्यादि प्राणाहुती दोनदा म्हणाव्यात, उजव्या हाताने देवीला नैवेद्य भरवीत आहोत अशी क्रिया करावी. -

श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । पंचाम्रुतनैवेद्यं समर्पयामि ।

ऋतं त्वा सत्येन परिषिंचामि ।

ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा । ॐ व्यानाय स्वाहा ।

ॐ उदानाय स्वाहा । ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रह्मणे स्वाहा ।

(एक एक पळी पाणी उजव्या हाताने ताम्हणात सोडावे.) -

उत्तरापोशनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि ।

गंध फुलाने वाहावे -

करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ।

विड्याच्या दोन पानांवर सुपारी व दक्षिणा ठेवावी. पळीभर पाणी तीवर सोडावे.

श्रीमहालक्ष्मै नमः मुखवासार्थे पूगीफल तांबूलं समर्पयामि । दक्षिणां समर्पयामि ॥

गंधाक्षता पुष्प वाहावे.

श्रीमहालक्ष्मै नमः मंत्रपुष्पं समर्पयामि ।

ताम्हणात उजव्या हाताने पळीभर पाणी सोडावे.

अनेन पूर्वपूजनेन श्रीमहालक्ष्मीसरस्वत्यौ प्रीयताम् ॥

अभिषेक - लक्ष्मीची मूर्ती असेल तर ताम्हनात ठेवून पळी पळी पाण्याने अभिषेक करावा, तसबीर असेल तर फुलाने पाणी शिंपडीत असता श्रीसूक्त पठण करावे.

हेही वाचा: Dhanteras 2022 : धनत्रयोदशीचं नेमकं धन कोणतं? समजून घ्या काळानुरूप अर्थ

श्रीसुक्त मंत्र ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । महाभिषेकस्नानं समर्पयामि ।

शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।

अभिषेकानंतर गंधाक्षता व फूल वाहावे, नंतर नमस्कार करावा.

सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं च समर्पयामि । नमस्करोमि ।

ताम्हणातून देवीची मूर्ती काढून पुसून कलशावरील तबकात जागी ठेवावी.

वस्त्रे कलशाभोवती उपरणे गुंडाळावे व खण ठेवावा. -

दिव्यांबरं नुतनं हि क्षौमं त्वतिमनोहरम् ।

दीयमानं मया देवि गृहाण जगदंबिके ॥

श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । वस्त्रयुग्मं समर्पयामि ।

आभूषणे (दागिने अर्पण करावेत.) -

रक्तकंकणवैदूर्य - मुक्ताहारादिकानि च ।

सुप्रसन्नेन मनसा दत्तानि स्वीकुरुष्व त्वम् ॥

श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । नानाविध - भुषणानि समर्पयामि ।

चंदन - (गंध लावावे.) -

श्रीखंडागुरुकर्पूरमृगनाभिसमन्वितम् ।

विलेपनं गृहाणाशु नमस्ते भक्तवत्सले ॥

श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । विलेपनार्थे चंदनं समर्पयामि ।

हळदकुंकू - (हळदकुंकू वाहावे.) -

हरिद्रा स्वर्नवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी ।

सर्वालंकारमुख्या हि देवि त्वं प्रतिगृह्यताम् ॥

हरिद्राचूर्णसंयुक्तं कुंकुमं कामदायकम् ।

वस्त्रालंकारभूषार्थं देवि त्वं प्रतिगृह्यताम् ॥

श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । हरिद्राकुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि ।

सिंदूर - (सिंदूर वहावा.) -

उदितारुणसंकाशं जपाकुसुमसंनिभम् ।

सीमंतभूषणार्थाय सिंदूरं प्रतिगृह्यताम् ॥

श्रीमहालक्षीसरस्वतीभ्यां नमः । सिंदूरं समर्पयामि ।

परिमलद्रव्ये (अत्तर, अबीर, अष्टगंध, देवीवर व वह्यांवर वाहावे.) -

ज्योत्स्नापते नमस्तुभ्यं नमस्ते विश्वरूपिणे ।

नानापरिमलद्रव्यं गृहाण परमेश्वरि ।

तैलानि च सुगंधिनि द्रव्याणि विविधानि च ।

मया दत्तानि लेपार्थं गृहाण परमेश्वरि ॥

श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । नानापरिमलद्रव्याणि समर्पयामि ।

फुले - (देवीला फुले वाहावीत.)

मंदारपारिजातादीन् पाटलीं केतकीं तथा ।

मरुवामोगरं चैव गृहाण परमेश्वरि ॥

श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । पूजार्थे कालोद्भवपुष्पाणि समर्पयामि ।

धूप - (उदबत्ती, घंटानाद करीत ओवाळावी.) -

वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंध उत्तमः ।

आघ्रेयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् ॥

श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । धूपं समर्पयामि ।

दीप - (निरांजन, घंटानाद करीत ओवाळावे.) -

कार्पासवर्तिसंयुक्तं घृतयुक्तं मनोहरम् ।

तमोनाशकरं दीपं गृहाण परमेश्वरि ।

श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । दीपं समर्पयामि ।

नैवेद्य - (साखरफुटाणे, बत्तासे, पेढे- जो नैवेद्य असेल तो पात्रात देवीपुढे ठेवावा. पात्राखाली पाण्याने लहानसा चौकोन करून वर पात्र ठेवावे. नैवेद्यावर तुलसीदलाने उदक प्रोक्षण करावे. प्राणाय स्वाहा इत्यादि प्रत्येक स्वाहाकार म्हणताना देवीला उजव्या हाताने नैवेद्य भरवीत आहोत अशी कृती करावी. नैवेद्यावर पळीभर पाणी उजव्या हाताने फिरवावे.) -

श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । (पदार्थाचे नाव )

नैवेद्यं समर्पयामि । ऋतं त्वा सत्येन परिषिंचामि ।

ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा । ॐ व्यानाय स्वाहा ।

ॐ उदानाय स्वाहा । ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रह्मणे स्वाहा ।

(एक एक पळी पाणी ताम्हणात सोडावे)

उत्तरापोशनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि ।

(पुन्हा पळीभर पाणी ताम्हणात सोडावे)

श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । आचमनीयं समर्पयामि ।

(गंध फुलाने वाहावे.)

श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ।

तांबूल - (विड्याची दोन पाने त्यावर सुपारी ठेवून देवीसमोर ठेवावी व त्यावर पळीभर पाणी सोडावे.)

एलालावंगकर्पूर - नागपत्रादिभिर्युतम् ।

पूगीफलेन संयुक्तं तांबूलं प्रतिगृह्यताम् ॥

श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । मुखवासार्थे पूगीफल तांबूलं समर्पयामि

दक्षिणा - (देवीसमोर पानसुपारीवर दक्षिणाद्रव्य ठेवून त्यावर तुलसीदल, फूल ठेवून उजव्या हाताने पळीभर पाणी सोडावे.) -

हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीजं विभावसोः ।

अनन्तपुण्यफलदमतः शांति प्रयच्छ मे ॥

श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । सुवर्णपुष्पदक्षिणां समर्पयामि ॥

फळे - (देवीला यथाशक्य पक्व फळे अर्पण करावीत. ती देवीपुढे ठेवून त्यावर उजव्या हाताने पळीभर पाणी वाहावे.)

फलेन फलितं सर्व त्रैलोक्यं सचराचरम् ।

तस्मात्फलप्रदानेन सफलाः स्युर्मनोरथाः ॥

श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । ऋतुलब्धानि फलानि समर्पयामि ।

कापूरारती - (कापूर आरती ओवाळावी. त्यावेळी घंटा वाजवावी.)

ह्रत्स्थाज्ञानतमोनाशक्षमं भक्त्या समर्पितम्‍ ।

कर्पूरदीपममलं गृहाणं परमेश्वरि ।

यानंतर क्ष्मीगायत्री मंत्र म्हणावा.

लक्ष्मीगायत्री - ॐ महालक्ष्मी च विद्महे, विष्णुपत्‍नी च धीमहि । तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ।

श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । मंत्रपुष्पं समर्पयामि ।

हेही वाचा: Dhanteras Rangoli Designs: धनत्रयोदशीच्या निमित्ताने सुंदर रांगोळी काढा, पहा 'या' प्रकारच्या उत्तम डिझाइन्स

लेखणी/ पेन सहित वही पूजा

लेखणी/ पेन सहित वही पूजा

लेखणी/ पेन सहित वही पूजा

या मंत्राचा उच्चार करुन गंधाक्षता, हळदकुंकू व लाल फूल वाहावे. -

शुक्लां ब्रह्मविचारसारपरमामाद्यां जगद्‍व्यापिनीम् )

वीणापुस्तकधारिणीमभयदां जाड्यांधकारापहाम् ।

हस्ते स्फटिकमालिकां विदधती पद्मासने संस्थिताम् ।

वंदे त्वां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम् ॥

कृष्णानने द्विजिव्हे च चित्रगुप्तकरस्थिते ।

सदक्षराणा पात्रे च लेख्यं कुरु सदा मम ॥

लेखन्यै नमः । ध्यानं समर्पयामि ।

कुबेर पूजा

ताम्हणात किंवा केळीच्या पानावर ठेवलेल्या चांदीच्या नाण्यांची, दागिन्यांची, नोटांची धनपति कुबेर म्हणून पूजा करावी. संपत्तीवर गंधाक्षता व फूल वाहावे. नमस्कार करावा.

ॐ धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपाय च ।

भवंतु त्वत्प्रसादान्मे धनधान्यादिसंपदः ॥

ॐ द्रव्यनिधिस्थान-कुबेराय नमः । ध्यान-आवाहनादिसकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि ।

तुला पूजा

(तराजू व वजने-मापे यांची पूजा)

(तराजू व वजने-मापे यांवर लाल गंध, अक्षता, हळदकुंकू व फुले वाहावीत.) -

नमस्ते सर्व देवांना शक्तित्वे सत्यमाश्रिता ।

साक्षिभूता जगद्धात्रि निर्मिता विश्वयोनिना ।

तुलायै नमः । सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पाणि हरिद्राकुंकुमं च समर्पयामि ।

दीप पूजा

दिव्यांच्या सजावटीला गंधपुष्प, अक्षता व हळदकुंकू वाहून नमस्कार करावा.

भो दीप ब्रह्मरूपस्त्वमन्धकारनिवारक ।

इमां मया क्रुता पूजां गृह्णन् तेजः प्रवर्तय ॥

दीपावलिं मया दत्तां गृहाण त्वं सुरेश्वरि ।

आरार्तिक्यप्रदानेन ज्ञानदृष्टिप्रदा भव ॥

अग्निज्योती रविः ज्योतिश्चन्द्रज्योतिस्तथैव च ।

उत्तमः सर्वतेजस्सु दीपोऽयं प्रतिगृह्यताम् ॥

दीपावल्यै नमः । सकलपूजार्थे गंधाक्षतान् पुष्पं हरिद्राकुंकुमं च समर्पयामि ।

यानंतर लक्ष्मी- कुबेराची आरती करावी.

हेही वाचा: Dhanatrayodashi 2022: देव आणि असुरांनी समुद्रमंथन का केले, त्यातून कोणती 14 रत्ने बाहेर आली?

लक्ष्मी- कुबेर आरती ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

मंत्रपुष्पांजलि - 'ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त० पासून सभासद इति ।" पर्यंतचे मंत्र सर्वांनी यथाशक्य सुस्वर म्हणावेत व हातातील फुल एकेकाने देवीवर वाहावीत.

मंत्रपुष्पांजली ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रदक्षिणा-नमस्कार-प्रार्थना (स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालावी व देवीला साष्टांग नमस्कार करावा.)-

यानि कानि च पापानि ब्रह्महत्यासमानि च ।

तानि तानि विनश्यंति प्रदक्षिणपदे पदे ॥

श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । प्रदक्षिणां समर्पयामि । नमस्करोमि ।

प्रार्थना - (महालक्ष्मी -महासरस्वती यांची प्रार्थना उभे राहून हात जोडून करावी.)

नमस्ते सर्वदेवानां वरदाऽसि हरिप्रिये ।

गतिर्या त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात्त्वदर्चनात् ॥१॥

विश्वरूपस्य भार्याऽसि पद्मे पद्मालये शुभे ।

महालक्ष्मि नमस्तुभ्यं सुखरात्रिं कुरुष्व मे ॥२॥

वर्षाकाले महाघोरे यन्मया दुष्कृतं कृतम् ।

सुखरात्रिः प्रभातेऽद्य तन्मेऽलक्ष्मीं व्यपोहतु ॥३॥

या रात्रिः सर्वभूतानां या च देवेष्ववस्थिता ।

संवत्सरप्रिया या च सा ममास्तु सुमंगलम् ॥४॥

माता त्वं सर्वभूतानां देवाना सृष्टिसंभवा ।

आख्याता भूतले देवि सुखरात्रि नमोऽस्तु ते ॥५॥

दामोदरि नमस्तेऽस्तु नमस्त्रैलोक्यमातृके ।

नमस्तेऽस्तु महालक्ष्मि त्राहि मां परमेश्वरि ॥६॥

शंखचक्रगदाहस्ते शुभ्रवर्णे शुभानने ।

मह्यमिष्टवरं देहि सर्विसिद्धिप्रदायिनि ॥७॥

नमस्तेऽस्तु महालक्ष्मि महासौख्यप्रदायिनि ।

सर्वदा देहि मे द्रव्यं दानाय भुक्तिहेतवे ॥८॥

धनं धान्यं धरां हर्म्यं कीर्तिमायुर्यशः श्रियः ।

तुरगान्दन्तिनः पुत्रान्महालक्ष्मि प्रयच्छ मे ॥९॥

यन्मया वांछितं देवि तत्सर्वं सफलं कुरु ।

न बाध्यतां कुकर्माणि संकटान्मे निवारय ॥१०॥

न्यूनं वाऽप्यतुलं वापि यन्मया मोहितं कृतम् ।

सर्वं तदस्तु संपूर्णं त्वत्प्रसादान्महेश्वरि ॥११॥

या मंत्रांने देवीला आपल्या हातून कळत- नकळत चुकांची क्षमा मागावी. मोवांछित इच्छा पुर्तीसाठी कामना करावी.

आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम् । पूजां चैव जानमि क्षम्यतां परमेश्वरि ॥१॥

गतं पापं गत दुःखं गतं दारिद्यमेव च । आगता सुखसंपत्तिः पुण्याच्च तव दर्शनात् ॥२॥

रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि । पुत्रान्देहि धनं देहि सर्वकांमाश्च देहि मे ॥३॥

अपराधसहस्त्रं च क्रियतेऽहर्निशं मया । दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वरि ॥४॥

यस्य स्मृत्या च नामोक्त्या तपः पूजाक्रियादिषु । न्यूनं संपूर्णता याति सद्यो वंदे तमच्युतम् ॥५॥

मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरि । यत्कृतं तु मया देवि परिपूर्णम् तदस्तु मे ॥६॥

॥ इति पूजाविधिः समाप्त ॥

माहिती संकलन - अशोककाका कुलकर्णी (संचालक धर्मज्ञानगंगा समूह, नाशिक

हेही वाचा: Dhanteras 2022: धनत्रयोदशीला सायंकाळी करा राशीनुसार या गोष्टींची खरेदी, ठरेल फारच शुभ