पैगंबरांना साक्षात्कारानंतर इस्लाम धर्माची मुहूर्तमेढ

वयाच्या ३५ वर्षापर्यंत हजरत पैगंबर यांनी समाज सुधारणेची अनेक कामे केली. परंतु ते अस्वस्थ होते.
Ramadan
RamadanSakal
Summary

वयाच्या ३५ वर्षापर्यंत हजरत पैगंबर यांनी समाज सुधारणेची अनेक कामे केली. परंतु ते अस्वस्थ होते.

- डॉ. एस. एन. पठाण

वयाच्या ३५ वर्षापर्यंत हजरत पैगंबर यांनी समाज सुधारणेची अनेक कामे केली. परंतु ते अस्वस्थ होते. लोकांचा अधःपात थांबविण्याकरिता काय करावे, याचा विचार करण्यासाठी ते 'हीरा' नावाच्या पर्वतावरील एका गुहेत ध्यानस्थ बसत असत. ते ध्यानस्थ बसले की कित्येक वेळा रात्र संपून जाई परंतु त्यांना त्याचे भानही नसे. एक दिवस त्यांना अरबस्तानातील नव्हे तर जगातील अधोगती थांबविण्यासाठी परमेश्वराची आज्ञा झाली. त्यांच्या अंगाला दरदरून घाम आला. त्यांनी ही हकिगत खदिजाबी यांना सांगितली. तेव्हा त्यांना धीर देत त्या उद्गारल्या ‘खाविंद उठा! साऱ्या जगाला सत् धर्माची घोषणा करण्याचा मान परमेश्वराने आपणास दिला आहे आणि सदधर्माची मुहूर्तमेढ रोवून कामाला लागा आणि परमेश्वराच्या आज्ञेनुसार इस्लाम धर्माची मुहूर्तमेढ रोवली गेली. कधी कधी ते बेचैन होत व त्यांना घाम फुटे. देवदूत जिब्राईल आले सलाम यांच्या वाणीद्वारे मग ते बोलावयास लागत व व लोक ते लिहून घेत म्हणजेच इस्लामचा धर्मग्रंथ पवित्र कुराण की, ज्याचे अवतरण रमजानच्या महिन्यात पूर्ण झाले.

या सदधर्माच्या विरुद्ध पैगंबराचा छळ करण्यात आला. परंतु त्यांची चळवळ सत्य, न्याय आणि प्रेम यांचा पुरस्कार करणारी होती. त्यांच्या अंगावर गटारातील घाण पाणी टाकले, म्हणून ते कधीही डगमगले नाही.

हजरत महंमद पैगंबरांना ठार मारण्याचा कट एकदा कुरेशी लोकांनी आखला. त्यांच्या घराला वेढा घातला. तलवारी उपसल्या. परंतु याची चाहूल लागताच ते एका खिडकीतून बाहेर पडले व अबू बक्र यांचेबरोबर रात्रभर दगड धोंड्यातून चालत मदिना शहरी पोहचले यालाच ‘हिजरत’ असे म्हणतात. २ जुलै ६२२ रोजी ते सुखरूप मदिनेस पोहचले.

सत्य, न्याय, सहिष्णुता, प्रेम आणि शांतीवर आधारित इस्लाम धर्माचा प्रसार त्यांच्या हयातीत संपूर्ण अरबस्तानात झाला. पुढे ते धर्मगुरू आणि बादशहा झाले. त्यांच्या निधनानंतर इस्लामचा प्रसार संपूर्ण जगात झाला आणि शांतीचा संदेश देणारा ‘इस्लाम’ धर्म उदयाला आला.

(लेखक माजी कुलगुरू आहेत.)

* इफ्तार - ६.५४ (शुक्रवारी सायंकाळी)

* सहेरी - ४.५७ (शनिवारी पहाटे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com