Horoscope: सूर्य-शुक्र युतीमुळे ‘या’ राशींना मिळेल भरपूर पैसा; जाणून घ्या, काय आहे तुमच्या राशीत? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope

Horoscope: सूर्य-शुक्र युतीमुळे ‘या’ राशींना मिळेल भरपूर पैसा; जाणून घ्या, काय आहे तुमच्या राशीत?

ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि शुक्र हे दोन्ही महत्त्वाचे ग्रह मानले जातात. सूर्य हा आत्मा, पिता, सन्मान, यश, प्रगती, सरकारी आणि निमसरकारी क्षेत्रात उच्च सेवेचा करक ग्रह मानला जातो.

तर दुसरीकडे, शुक्र हा भौतिक सुख, वैवाहिक सुख, विलास, कीर्ती, कला, प्रतिभा, सौंदर्य, प्रणय, लैंगिक लालसा आणि फॅशन-डिझायनिंग इत्यादींचा करक ग्रह मानला जातो.

शुक्र हा वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी आहे आणि मीन ही त्यांची उच्च राशी आहे, तर कन्या ही त्यांची दुर्बल राशी आहे. विशेषत: सूर्य आणि शुक्र यांच्या युतीला ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे. या दोन महत्त्वाच्या योगांचा राशींवर काय परिणाम होईल हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया…

सिंह राशीमध्ये सूर्य-शुक्र युती तयार झाली आहे. ऑगस्टमध्ये सिंह राशीतील दुसरी युती सूर्य आणि शुक्र यांच्यामध्ये असेल. ज्योतिषशास्त्रात या युतीला खूप महत्त्वाचे मानले जाते. यामागचे कारण असे की हे दोन ग्रह जरी खूप शुभ असले तरी त्यांच्या युतीमुळे होणारे परिणाम हे अशुभ असणार आहे. यामागचं शास्रानुसार कारण असं आहे की, जेव्हा शुक्र सूर्याजवळ येतो तेव्हा तो अस्त होतो आणि त्याचे सर्व चांगले परिणाम गमावून बसतो. त्यामुळे जेव्हा केव्हा सूर्य-शुक्र युती होते, तेव्हा त्या राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागतो. सामान्यतः असे दिसून येते की ज्या कुंडलीत रवी-शुक्र युती असते, अशा लोकांना वैवाहिक जीवनात सुख मिळत नाही, त्यांचे वैवाहिक जीवन लांबते, तसेच त्यांना शुक्र संबंधी आजारांना देखील सामोरे जावे लागते.

हेही वाचा: Chanakya Niti: ‘या’ 4 गोष्टी स्वीकारताना कधीही संकोच करू नका, चमकणार तुमचे भविष्य

सिंह राशीमध्ये सूर्य-शुक्र युती कोणत्या राशीना लाभदायक ठरेल ?

● वृषभ:

सूर्य-शुक्र युतीच्या प्रभावामुळे जीवनात सुख-समृद्धी येईल आणि तुमच्या जीवनातील सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. या काळात तुम्ही काही चैनीच्या वस्तू खरेदी करू शकाल,तुमची कौटुंबिक जीवन चांगले असेल आणि या राशीचे विद्यार्थी जे त्यांच्या उच्च शिक्षणाची तयारी करत आहेत त्यांना सकारात्मक फळ मिळेल.

● मिथुन:

मिथुन राशीच्या लोकांचे संवाद कौशल्य या काळात उत्तम वाढेल. तसेच बहिण भावासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. या काळात तुम्ही विदेशवारीला जाण्याचा विचारही करू शकता. यामुळे कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे नाते घट्ट होईल. याशिवाय या काळात तुमचे तुमच्या वडिलांसोबत खूप पटेल. मार्केटिंग, सोशल मीडिया आणि सल्लागार क्षेत्राशी संबंधित सगळ्याच लोकांना या काळात सकारात्मक फळ मिळू शकते.

● कर्क:

कर्क राशीच्या लोकांच्या जीवनावर पैशाचा प्रभाव या काळात प्रेक्षणीय राहील. या काळात तुमचे उत्पन्न एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून शक्य होईल. तुमच्या आयुष्यात तुमच्याकडे भरपूर पैसा असेल, जो तुम्ही तुमच्या आरामासाठी खर्च कराल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. तुम्ही लांबच्या प्रवासाला जाऊ शकता. आर्थिक क्षेत्राशी निगडीत काम करणाऱ्यांसाठीही हा राशी परिवर्तनाचा टप्पा अनुकूल असेल.

हेही वाचा: Budh Gochar 2022: जुलैमध्ये बुध ग्रह 3 वेळा राशी बदलणार, 'या' चार राशींना होणार लाभ

● कुंभ:

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील. या राशीचे अविवाहित लोक लग्न करण्याचा निर्णय घेऊ शकतात. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळतील. तसेच, तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि तुम्ही पैसे जमा करण्यात यशस्वी व्हाल. तुम्ही यशस्वी व्हाल आणि जर तुम्ही पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे.

● धनु:

धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल राहील. यावेळी तुम्ही लांब आणि महागड्या प्रवासाचे नियोजन करू शकता. यासोबतच तुम्हाला तुमच्या वडिलांचा आणि तुमच्या शिक्षकांचाही पाठिंबा मिळेल. अध्यात्माकडे तुमचा कल अधिक असेल. या राशीच्या आणि उच्च शिक्षणाचे नियोजन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हा काळ अनुकूल आहे.

ज्यांच्या राशीत सूर्य-शुक्र युती आहे त्यांनी हे उपाय करावे?

1) विशेषत: यावेळी आपल्या वडिलांचा आदर करा आणि नातेसंबंध मजबूत करण्यासाठी पावले उचला.

2) गाईंना नियमित पोळी खायला द्यावी.

3) दररोज ध्यान धारना करावी, सूर्यनमस्कार करा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.

4) नित्यनेमाने देवी दुर्गेची पूजा करावी.

Web Title: Due To Surya Sukhra Rashi Alliance These Rashis People Will Get A Lot Of Money

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..