
Budh Gochar 2022: जुलैमध्ये बुध ग्रह 3 वेळा राशी बदलणार, 'या' चार राशींना होणार लाभ
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका निश्चित वेळेच्या अंतराने आपली राशी बदलतो. बुध ग्रह 27 दिवसांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतो. सध्या चर्चेत असलेला बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, व्यापार आणि धनाचा कारक मानला जातो.
विशेष म्हणजे बुधची संक्रमणाची वेळ कमी किंवा जास्त असू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार या जुलै 2022 मध्ये बुध ग्रह 3 वेळा राशी बदलणार आहे आणि यामुळे सर्व 12 राशींवर त्याचा परिणाम होणार. कोणत्या राशींसाठी ते शुभ राहील, याविषयी जाणून घेऊया.
हेही वाचा: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 6 जुलै 2022
ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाने 2 जुलै रोजी मिथुन राशीत प्रवेश केला. यानंतर 17 जुलै रोजी बुध कर्क राशीत प्रवेश करणार आहे तर 31 जुलै रोजी बुध कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल. त्यामुळे या चार राशींना याचा लाभ होणार.
हेही वाचा: समाजप्रबोधनासाठी आषाढी वारीचे निमित्त
सिंह - सिंह राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण शुभ ठरणार आहे. या काळात नोकरीत उत्पन्न वाढू शकते. नोकरीमध्ये तुम्हाला बढती किंवा नवीन नोकरीची ऑफरसुद्धा मिळू शकते. जोडीदारासोबत चांगले संबंध निर्माण होतील. जे व्यवसाय करत आहेत, त्यांना फायदा होऊ शकतो.
मकर - या राशीच्या लोकांना जुलैमध्ये बुधाच्या संक्रमणाचा विशेष लाभ होऊ शकतो. नोकरी आणि करिअरमध्ये प्रचंड वाढ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी केलेल्या तुमच्या कार्याची प्रशंसा होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायात आर्थिक प्रगतीचे योग येतील.
हेही वाचा: Ashadhi wari : विठ्ठल भक्तीचा लळा... आनंदाचा सोहळा...
वृषभ- जुलैमध्ये बुधाचे तीनदा होणारे संक्रमण लाभदायक ठरेल. नवीन नोकरी मिळाल्याने उत्पन्न वाढू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमची योग्यता सिद्ध करू शकाल. बुधाच्या संक्रमणामुळे आर्थिक बाजूही मजबूत होण्याची दाट शक्यता आहे.
कन्या - बुधाचे संक्रमण कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक प्रभाव आणेल. नोकरीत प्रमोशन मिळू शकते. पगारातही वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात विस्तारासह आर्थिक प्रगती होईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी बुधाचे संक्रमण शुभ संकेत आहेत.
Web Title: Due To Budh Gochar In July 2022 These Four Zodiac Signs Will Get Benefit Check Here List
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..