
Durgashtami Horoscope 2025
Sakal
Zodiac Signs Benefits Durga Ashtami: आज नवरात्रीचा नववा दिवस असून दुर्गाष्टमी आहे. देवीच्या उपासनेसाठी आणि पूजेसाठी हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. याच दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता. आज अनेक घरांमध्ये कुमारिका पूजन देखील केले जाते. या दिवशी केलेली पूजा सर्व पापांपासून मुक्ती मिळवून देते अशी श्रद्धा आहे.
आजच्या या शुभ दिवशी चंद्र धनु राशीत, पूर्वाषाढा नक्षत्रात दिवसभर भ्रमण करेल आणि गुरुच्या दृष्टीत राहील, ज्यामुळे गजकेसरी योग तयार होईल. याशिवाय, सूर्यापासून द्वादश घरात शुक्र आणि द्वितीय घरात मंगळ असल्याने उभयचर योग तयार होत आहे. ग्रहांच्या या स्थितीमुळे अनेक राशींना आज विशेष लाभ मिळतील. चला पाहूया आजचे संपूर्ण राशिभविष्य.