Dasara Rashi bhavishy : दसऱ्याच्या दिवशी 2 ऑक्टोबर रोजी पहाटे 3.34 वाजता बुध तुळ राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार हा दसरा दिवस मानला जाईल,कारण बुध 3 ऑक्टोंबर रोजी बुध सूर्योदयपूर्वी तुळ राशीत प्रवेश करेल. .तसेच ज्योतिषशास्त्रानुसार, 3 ऑक्टोंबर हे एक संक्रमण मानले जाईल. बुधाचे हे संक्रमण महत्त्वाचे आहे कारण या संक्रमणदरम्यान बुध आधीच तूळ राशीत असलेल्या मंगळाशी युती करेल. यामुळे बुध मंगळ युती देखील निर्माण होईल. ज्योतिषशास्त्रत, बुध हा बुद्धिमत्तेचा कारक आणि ग्रहांचा राजकुमार मानला जातो दुसरीकडे, मंगळाला शक्ती आणि आनंद देणारा कारक आणि ग्रहांचा सेनापती मानले जाते. म्हणूनच या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे बुद्धिमत्ता आणि शक्ती एक अद्भुत संयोजन निर्माण होईल. जो मेष आणि कर्क या सह अनेक राशींसाठी फायदेशीर ठरेल. तर, तुळ राशीत बुध संक्रमणाचा कोणत्या राशींना फायदा होईल ते जाणून घेऊया.मेष राशीवर बुध संक्रमणाचा प्रभाव करिअरमध्ये यश मिळणार आहे. या राशीच्या सातव्या घरात बुध ग्रहाचे भ्रमण मंगळ आणि चंद्र यांच्यात युती निर्माण करत आहे. यामुळे व्यवसायात यश मिळेल. मंगळ हा ऊर्जा धैर्य, आणि संपत्तीचा कारक मानला जातो. ही युती तुम्हाला यशस्वी बनवेल. चंद्र मन आणि भावनांचे प्रतिनिधित्व करतो, तुमची मानसिक स्थिती मजबूत करतो. कुटुंबात आनंदी वातावरण राहील आणि तुम्ही तुमच्या कारकिर्दीतही यशस्वी व्हाल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खूप वेळ घालवाल. तसेच प्रत्येक वळणावर तुमची साथ देईल.बुध राशीच्या संक्रमणाचा कर्क राशीवर प्रभाव पैसे कमविण्याच्या संधी प्राप्त होणार आहेत. बुध ग्रह कर्क राशीच्या चौथ्या घरात भ्रमण करणार आहे. यामुळे मंगळ आणि चंद्र यांच्यात युती होईल, ज्यामुळे तुमच्या जीवनात आनंद येईल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून समस्यांना तोंड देत असाल तर आता तुमची त्यापासून सुटका होणार आहे. .आर्थिक बाबींमध्येही फायदा होईल आणि पैसे कमविण्याच्या चांगला संधी निर्माण होतील. तुम्हाला आर्थिकदृष्ट्या प्रगती होण्याचे लाभ मिळू शकतात. तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. सामाजिक क्षेत्रात हा काळ तुमच्यासाठी कमी फायदेशीर ठरू शकतो. परंतु व्यवसाय आणि आर्थिक बाबींमध्ये बुधाचे भ्रमण तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील..बुध राशीच्या संक्रमणाचा तूळ राशीवर प्रभावप्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची जास्त शक्यता आहे .या राशीच्या पहिल्या घरात बुध ग्रहाचे भ्रमण होणार आहे. बुध ग्रहाचा तूळ राशीत प्रवेश तुम्हाला अत्यंत शुभ ठरणार आहे. चंद्र आणि मंगळाची युती तुम्हाला प्रत्येक कामात धाडसी बनवणार आहे. यामुळे तुम्हाला कामात पटकन आणि योग्य निर्णय घेण्यास फायदा होऊ शकतो आणि तुमचे व्यक्तिमत्व देखील आकर्षक बनणार आहे. चंद्र-मंगळ युती तुमची मानसिक स्थिती मजबूत करेल त्यामुळे तुमचा भावनांवर नियंत्रण राहील. हा काळ तुमच्या लवलाईफसाठी खूप चांगला असेल. तुमच्या दोघांमधील प्रेम अधिक दृढ होईल आणि तुम्हाला व्यवसायातही लक्षणीय नफा मिळेल. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते आणि तुमच्या आयुष्यात आनंदच आनंद येणार आहे..बुध राशीच्या संक्रमणाचा धनु राशीवर प्रभावआर्थिक बाबतीत खूप फायदा होणार आहे. बुध ग्रह धनु राशीच्या ११ व्या घरात भ्रमण करणार आहे. यामुळे तुम्हाला अनेक क्षेत्रात फायदा होऊ शकतो. जर तुम्ही आर्थिक बाबतीत योग्य गणित ठेवून निर्णय घेतले तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. याव्यतिरिक्त, पैसे कमविण्याच्या संधी देखील निर्माण होणार आहेत. व्यवसाय आणि व्यापारात नफा मिळण्याची चांगली शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात. परंतु तुम्ही कोणतेही तुम्हाला संकटात टाकणारे निर्णय घेणे टाळावेत. कौटुंबिक बाबी अनुकूल राहतील आणि तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवू शकता..अंकशास्त्रानुसार 22 सप्टेंबरपासून 'या' मूलांकांना मिळणार प्रेम आणि धनलाभ! जाणून घ्या तुमचं भविष्य .बुध राशीच्या संक्रमणाचा मकर राशीवर परिणामतुम्हाला मोठे पद मिळण्याची शक्यता आहे. बुध तुमच्या राशीच्या दहाव्या घरात भ्रमण करणार आहे. चंद्र आणि मंगळाच्या युतीमुळे व्यवसायात गुंतलेल्यांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल राहील. तुमच्या व्यवसायात वाढ आणि यशाचे नवीन मार्ग तुम्हाला सापडतील. जर तुम्ही सरकारी नोकरीत असला तर उच्च पदावर पोहोचू शकता, ज्यामुळे तुमचा आनंद द्विगुणीत होईल. तुमच्या कठोर परिश्रमामुळे कामाच्या ठिकाणी लक्षणीय नफा मिळेल, तुमची संपत्ती वाढेल. तुमच्या वैयक्तिक जीवनातही चांगले आनंदी राहाल..नवरात्री विशेष महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचा अनुभव घ्या! नक्की भेट द्या .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.