
Daily Horoscope: आज 19 जून रोजी गुरुवार असून, हा दिवस अनेक शुभ योगांनी युक्त ठरणार आहे. गुरुवारचा संबंध गुरु ग्रहाशी असल्यामुळे या दिवशी अध्यात्मिक ऊर्जा अधिक प्रबळ असेल. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील नवमी तिथी असून, या दिवशी चंद्र मीन राशीत शनिसोबत संचार करेल. १९ जून हा दिवस खूपच खास ठरणार आहे. गुरुवार असल्यामुळे या दिवशी गुरु ग्रह प्रभावी असेल आणि चंद्र मीन राशीत शनिसोबत संचार करणार आहे. या दिवशी गुरु आणि चंद्र केंद्रात येत असल्याने गजकेसरी योग तयार होतो जो समृद्धी आणि यश देणारा योग मानला जातो.