
गणेश चतुर्थी 2025 मंगळवार, 26 ऑगस्टपासून सुरू होईल, परंतु उदयातिथीनुसार 27 ऑगस्टला मुख्य पूजा साजरी होईल.
मध्याह्न गणेश पूजा मुहूर्त 27 ऑगस्टला सकाळी 11:05 ते दुपारी 1:40 पर्यंत आहे, जो पूजेसाठी सर्वात शुभ आहे.
चंद्र दर्शन टाळण्यासाठी 26 ऑगस्टला दुपारी 1:54 ते रात्री 8:29 आणि 27 ऑगस्टला सकाळी 9:28 ते रात्री 8:57 पर्यंत सावधगिरी बाळगा.
Ganesh Chaturthi 2025 date and shubh muhurat: हिंदू धर्मात गणेशोत्सवाला खुप महत्व आहे. देशभरात गणेश चतुर्थी मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी केली जाते. कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात ही गणेश पूजनाने होते. गणेश भक्त देखील गणेशोत्सवाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. पण यंदा गणेश चतुर्थी कधी साजरी केली जाणार आहे हे जाणून घेऊया.