
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेश चतुर्थीला सुरु होणारा, सगळ्यांच्याच आवडीचा आणि अख्ख्या भारतभर साजरा हा १० दिवसांचा सण अनंत चतुर्थीला संपतो. मात्र या १० दिवसांत सर्वत्र जाल्लोशाह्चे वातावरण असते. लोक मोठ्या उत्साहात बाप्पाची पूजा करतात. ठिकठिकाणी गणेश मंडळांमध्ये वेगवेगळे देखावे उभे केले जातात. विविध स्पर्धा, खेळया आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
भारतात अनेक ठिकाणी गणेशोत्सव वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. इतकेच नाही तर गणेशोत्सव वेगवेगळ्या पद्धतीने देखील साजरा केला जातो. चला तर त्याबद्दल थोडं जाणून घेऊया.