Ganeshotsav Modak : उकडीच्या सव्वादोन लाख मोदकांची विक्री

गणेश चतुर्थीनिमित्त शहरात उकडीच्या मोदकांना मोठ्या प्रमाणात मागणी होती. सायंकाळपर्यंत सुमारे सव्वादोन लाख मोदकांची विक्री झाली.
Ukadiche Modak
Ukadiche Modak Esakal

गणेश चतुर्थीनिमित्त शहरात उकडीच्या मोदकांना मोठ्या प्रमाणात मागणी होती. सायंकाळपर्यंत सुमारे सव्वादोन लाख मोदकांची विक्री झाली असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. गतवर्षी हीच संख्या दीड लाख इतकी होती.

गणरायाला प्रतिष्ठापनेवेळी नैवेद्य दाखवण्यासाठी उकडीच्या मोदकांना विशेष महत्त्व असते.

त्यामुळे सर्वच व्यावसायिकांकडे ग्राहकांनी मोदकांची आगाऊ मागणी नोंदवली होती. त्यातही या मोदकांमध्ये पारंपरिक हातवळणीच्या मोदकांना अधिक पसंती असते. मात्र त्यासाठी विशेष कौशल्य लागते.

त्यानुसार दोन दिवसांपूर्वीच तयारीला सुरुवात झाली होती. मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मोदकांची विक्री सुरु होती. एक मोदक सुमारे ३० ते ३५ रुपये किमतीस उपलब्ध होता.

उकडीपाठोपाठ तळणीच्या मोदकांना सर्वाधिक मागणी होती. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील नागरिकांनी तळणीचे मोदक खरेदी केले. दिवसभरात तळणीच्या सुमारे आठ हजार किलो मोदकांची विक्री झाली. ४०० रुपये किलोप्रमाणे हे मोदक उपलब्ध होते. मोदकांच्या अन्य प्रकारांमध्ये चॉकलेट, आंबा, मावा, काजू व मलई मोदकांना भाविकांना पसंती दिली.

दरवर्षीप्रमाणे उकडीच्या आणि तळणीच्या मोदकांना सर्वाधिक मागणी होती. यंदा आम्ही ‘गुलाबजाम मोदक’ असा नवा प्रकार तयार केला होता. मोदकामध्ये गुलाबजाम आणि त्यामध्ये मोदकाचे सारण, अशा प्रकारे तो तयार करण्यात आला. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला.

- किशोर सरपोतदार, अध्यक्ष- महाराष्ट्र केटरिंग असोसिएशन

गतवर्षीच्या तुलनेत यंदा ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली होती. उकडीच्या मोदकांना तर आमच्या अपेक्षेपेक्षाही अधिक मागणी होती. आंबा आणि मावा मोदकांची मोठ्या संख्येने विक्री झाली.

- अनिल गाडवे, संचालक- काका हलवाई मिठाई

उकडीच्या मोदकांना चांगली मागणी होतीच. मावा आणि आंबा मोदकांचीही मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. दिवसभर नागरिकांच्या मागणीचा ओघ सुरूच होता.

- श्रीकृष्ण चितळे, चितळे बंधू मिठाईवाले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com