Gudi Padwa 2023 : कोणत्या दिशेला गुढी उभारणं शुभ मानलं जातं, जाणून घ्या मुहूर्त अन् दिशा

गुढी नेमकी कोणत्या दिशेला उभारावीत. चला तर जाणून घेऊया याबाबत सविस्तर
Gudi Padwa 2023
Gudi Padwa 2023esakal

Gudi Padwa 2023 : हिंदू धर्माचं नवं वर्ष गुढी पाडव्यापासून सुरु होतं. हा सण हिंदू कॅलेंडरच्या नव्या वर्षात आणि चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला साजरा केला जातो. या दिवशी काही धार्मिक गोष्टींचंही पालन करायचं असतं. जसे की गुढी नेमकी कोणत्या दिशेला उभारावीत. चला तर जाणून घेऊया याबाबत सविस्तर.

गुढी पाडवा 2023 मुहूर्त

प्रतिपदा तिथी 21 मार्च रोजी रात्री 10.52 वाजता सुरु होईल आणि 22 मार्च रोजी रात्री 8.20 ला समाप्त होईल. 22 मार्चला सकाळी 6.29 ते 7.39 पर्यंत पूजा मुहूर्त असणार आहे.

Gudi Padwa 2023
Gudi Padwa Recipe : पाडव्याला श्रीखंड पुरीचा बेत करताय? जाणून घ्या रेसिपी !

गुढी पाडव्याला पूजेची योग्य पद्धत

ब्रम्ह मुहूर्तावर सुगंधी तेल लावून अंघोळ करावी. यानंतर ब्रम्हदेवाची पूजा करावी. या दिवशी ब्रम्हदेवाने हे विश्व निर्माण केल्याचे पुराणात आढळते. घरातील सर्व सदस्यांनी मुहूर्ताच्या वेळी ब्रम्हदेवाची पूजा करावी. यानंतर घराचा मुख्य दरवाजा आंबा किंवा अशोकाची पाने आणि फुलांनी सजवावा. मुख्य गेटवर आणि घराच्या अंगणात रांगोळी काढली जाते.

Gudi Padwa 2023
Gudi Padwa 2023 : गुढी पाडव्याआधी आजच घरात करा हे बदल, घरात नांदेल सुखसमृद्धी अन् पैशांची भरभराट...

या दिवशी गुढी उभारण्याची पद्धत माहिती असणे फार महत्वाचे आहे. घराच्या मुख्य दारावर खांबाला पितळेचे भांडे किंवा कोणतेही भांडे उलटे टांगून त्यावर लाल, पिवळे किंवा भगवे रेशमी कापड बांधले जाते. गुढीपाडव्याला दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा. बांबूच्या काठीवर कलश उलटा ठेवून ध्वज फडकवणे विजयाचे प्रतिक मानले जाते. या गुढीस ब्रम्हध्वज असे म्हणतात. या दिवशी पुरणपोळी, गोड भाकरी आणि गूळ देवाला अर्पण केला जातो. दुढीपाडव्याच्या दिवशी घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन प्रसाद ग्रहण करत देवाचे आभार मानले पाहिजे. (Gudi Padwa)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com