Gudi Padwa: गुढीपाडव्याच्या या दोन गोष्टी अनेकांना माहीत नाहीत; जाणून घ्या

गुढीपाडव्याबद्दलच्या काही गोष्टी अनेकांना माहीत नाहीत.
Hidden Things about Gudi Padwa
Hidden Things about Gudi PadwaSAKAL
Updated on

Hidden Things about Gudi Padwa: आज गुढीपाडवा. हिंदू नववर्षाची सुरुवात. ब्रह्मदेवाने याच दिवशी जगाची निर्मिती केली, असं मानलं जातं. परंतु फक्त याच कारणामुळे गुढीपाडवा साजरा केला जात नाही. गुढीपाडवा अनेक कारणांसाठी महत्त्वाचा आहे. गुढीपाडव्याबद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत.

शालिवाहन शकाची सुरुवात- गुढीपाडव्याचे आणखी एक महत्त्व म्हणजे शालिवाहन शकाची सुरुवातसुद्धा पाडव्यापासून होते. शालिवाहन एक कुंभाराचा मुलगा होता. तो मातीची खेळणी बनवायचा. मातीचे शिपाई, घोडे, हत्ती अशी खेळणी तो बनवायचा. शालिवाहन ज्या राज्यात राहायचा त्या राज्याच्या राजाचे नाव होते सोमदत्त. एके दिवशी राजा विक्रमादित्यने शालिवाहन त्यांच्या राज्यावर आक्रमण केलं. त्यावेळी सोमदत्तला जाणवलं की त्याचे सैन्य निष्क्रीय झालं होतं. कारण तिथं अनेक वर्ष सगळं अलबेल होतं. लोक आनंदात राहत होते. त्यामुळे त्याचे सैन्य युद्ध करण्याची कला विसरून गेले होते. विक्रमादित्य राज्याचं आक्रमण ते परतवून लावण्याची क्षमता त्यात नव्हती.

Hidden Things about Gudi Padwa
Gudi Padwa: गुढीपाडवा फक्त सण नाही, तर विजयाचं प्रतीक आहे

यावेळी भुमिका बजावली ती शालिवाहननं...असं म्हटलं जाते की, शालिवाहनने मातीच्या खेळण्यावर पाणी शिंपडले. त्यामध्ये प्राण ओतले. ही मातीची खेळणी सचेत झाली. शिपाई चेतनामय झाले आणि त्यांनी लढाई जिंकून दिली.

ज्याप्रमाणे कुरुक्षेत्रामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला खडसावून सांगितले की.

''सांडी हे मुर्खपण, हाती घे धनुष्यबाण

संग्रामे हे कवण , कारूण्य तुझे"

म्हणजेच तू संग्रामात उभा आहेस, येथे तुझ्या भावनांना महत्त्व नाही. तुला लढायलाच हवं. अगदी त्याच पद्धतीने शालिवाहनने मरगळ आलेल्या सुस्त सैनिकांमध्ये युद्धाची चेतना जागवली. त्यांना प्रोत्साहित केले आणि या सैनिकांनी युद्ध जिंकून दिले. त्याची आठवण म्हणून हे शक सुरु झाले.

Hidden Things about Gudi Padwa
Gudi Padwa 2022 : गुढीपाडव्यादिवशी घरीच बनवा स्वादिष्ट पदार्थ

वसंत ऋतूची सुरुवात- गुढीपाडव्याचं आणखी एक महत्त्व म्हणजे या दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. वसंत ऋतू हा भगवंताचा आवडता ऋतू आहे, असं मानलं जाते. विभूतीयोगामध्ये तसेच भगवतगीतेमध्ये 'ऋतूनाम कुसूमाकरः' म्हणजेच वसंत ऋतूचा उल्लेख आढळतो. यावर भाष्य करताना संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, "वसंत तेथे वने,वने तेथे सुमने , सुमनी पालिंगने सारंगाची'' ते असंही म्हणतात की, ''गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शने समाधान, होई चित्ता' म्हणजेच संत ज्ञानेश्वरांनी गुरुला वसंत ऋतूची उपमा दिली आहे.

या सगळ्या गोष्टींमुळेच गुढीपाडव्याला साडे तीन मुहूर्तांपैकी एक म्हणतात आणि हिंदू धर्मात या दिवसाला खूप मह्त्त्व आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com