
Guru Purnima 2022: गुरु पौर्णिमा या वर्षी कधी आहे?
गुरुपौर्णिमा ही खूप ठिकाणी आषाढपौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते. वेदांचे रचनाकार महर्षि द्वैपायन वेदव्यास यांचा या दिवशी जन्म झाला होता. वेद व्यासांच्या जन्मामुळे हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. गुरुपौर्णिमाच्या दिवशीच व्यास जयंतीही साजरी केली जाते. तसेच त्यांची पूजा केली जाते. महर्षी वेद व्यास यांना पहिले गुरु मानले जाते. ते संस्कृतचे अद्वितीय जाणकार होते. त्यांनीच श्लोकांची रचना केली आहे. वेदांना वेगवेगळ्या शाखांमध्ये विभागण्याचे श्रेयही महर्षी वेद व्यासांनाच जाते. (Guru Purnima 2022 News)
हेही वाचा: पोलिसांच्या कमतरतेमुळे आंबोलीत तीन ते चार तास वाहतूक कोंडी
गुरुपौर्णिमेचा मुहूर्त (Guru Purnima 2022 Muhurt)
पंचांगानुसार यावेळी गुरुपौर्णिमा बुधवार, 13 जुलै रोजी आहे. गुरुपौर्णिमा ही सकाळी 4 वाजल्यापासून सुरू होत आहे. त्याच वेळी, पौर्णिमा तिथी 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजून 06 मिनिटांनी समाप्त होईल.
या वर्षी गुरुपौर्णिमेला कोणते चार राजयोग आले आहेत?
ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी गुरुपौर्णिमेला चार राजयोग तयार होत आहेत. या दिवशी गुरु, मंगळ, बुध आणि शनि शुभ स्थितीत असणार आहेत. या चार ग्रहांच्या शुभ स्थितीमुळे शशा, रुचक, भंग आणि हंस असे चार राजयोग तयार होत आहेत. याशिवाय बुधादित्य योगही या दिवशी तयार होत आहे. तसेच शुक्र देखील अनुकूल ग्रहांसह बसला आहे. त्यामुळे यंदाची गुरुपौर्णिमा विशेष मानली जात आहे.
गुरुपौर्णिमा नेमकी पूजा कशी करावी?
शास्राच्या मान्यतेनुसार गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणे हे खूप लाभदायी असते, असे मानले जाते. तसेच या दिवशी घरातील लक्ष्मी देवीची देखील पूजा केली जाते. अस म्हणतात की या दिवशी भगवान विष्णूला पंचामृत अर्पण केल्याने मनातील सर्व ईच्छा पुर्ण होतात.
घरातील लक्ष्मी देवी सदैव प्रसन्न राहण्यासाठी या दिवशी लक्ष्मीदेवीला खीर अर्पण केल्या जाते. एवढेच नाही तर या दिवशी गायीला चारा दिल्याने अनेक प्रकारचे दोष दूर होतात असेही सांगितले जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक जण हा मनोभावे आपल्या मानलेल्या गुरुची पूजा करतो आणि त्यांनी दिलेला गुरुमंत्राचा जप केला जातो. असं म्हणतात की, गुरुने आपल्याला ज्ञान दिले नाही तर आपण काहीही करु शकत नाही. त्यामुळे आपल्या संस्कृतीत गुरुंना विशेष स्थान आहे. म्हणून आताही देशभरात ही गुरुपौर्णिमा ही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
हेही वाचा: गोवा काँग्रेसला वाचवण्यासाठी सोनिया गांधींनी संकटमोचक म्हणून महाराष्ट्राच्या नेत्याला पाठवलंय
Web Title: Guru Purnima 2022 When Is Guru Purnima This Year And Its Importance
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..