Hindu Religion : लग्नातल्या सप्तपदीचं महत्व अन् 7 आकड्या मागचं रहस्य माहितीये? जाणून घ्या सविस्तर l Hindu Religion Marriage Rituals saptapadi seven fere | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hindu Religion

Hindu Religion : लग्नातल्या सप्तपदीचं महत्व अन् 7 आकड्या मागचं रहस्य माहितीये? जाणून घ्या सविस्तर

Hindu Marriage Rituals : हिंदू धर्मात १६ संस्कारांचं फार महत्व आहे. त्यातला एक फार महत्वाचा समजला जाणारा संस्कार म्हणजे लग्न आहे. लग्न हे पवित्र बंधन आहे. ज्यात फक्त दोन लोकांचं मिलन नाही तर जबाबदाऱ्या निभवणंपण असतं. या विवाह संस्कारात ७ या आकड्याला विशेष महत्व आहे. ७ फेरे (सप्तपदी), ७ शब्द, ७ जन्म या सगळ्याला हिंदू धर्म विवाहात फार महत्व आहे.

विवाह शब्दाचा अर्थ

तज्ज्ञ म्हणतात विवाहाला कोणताही समानार्थी शब्द नाही. विवाह म्हणजे वी+वाह अर्थात विशेष रुपाने (उत्तरदायित्वाचे) वहन करणे.

७ या संख्येचे महत्व

हिंदू शास्त्रानुसार पृथ्वीवर आढळणाऱ्या सर्व महत्वपूर्ण वस्तूंची संख्या ७ मानली जाते. जसे सात सूर, इंद्रधनुष्याचे ७ रंग, ७ तारे, ७ महासागर, ७ ऋषी, ७ दिवस, ७ चक्र इत्यादी. म्हणूनच वैदिक आणि पौराणिक मान्यतांनुसार ७ अंक शुभ मानला जातो. हेच लक्षात घेऊन लग्नाच्या वेळी ७ फेरे घेतले जातात.

लग्नात सप्तपदी का करतात?

हिंदू धर्मात लग्नाला ७ जन्मांचं बंधन मानलं जातं. लग्नात वर वधू अग्नीला साक्षी मानून त्याच्या भोवती हे फेरे घेतात. त्याच वेळी, जन्मभर शरीर, मन आणि आत्मा यांच्यावर सात फेरे घेतले जातात आणि वधू पती-पत्नीचे नाते टिकवून ठेवण्याचे वचन देते. हे सात फेरे हिंदू विवाहाच्या स्थिरतेचे मुख्य आधारस्तंभ मानले जातात.

लग्नातले ७ वचन

लग्नाच्या सप्तपदीत ७ वचन दिले जातात. प्रत्येक फेऱ्यात वर-वधू आयुष्यभर साथ देण्याचे वचन घेत असतात. या फेऱ्यांना आणि वचनांना हिंदू धर्मात फार महत्व आहे. यानुसार २ लोक एकमेकांचा सन्मान करत भौतिक आणि अध्यात्मिक रुपाने एक होतात. याला लग्नाचे पवित्र बंधन मानले जाते. यामुळे व्यक्ती ७ जन्म ७ फेऱ्यांमधून जातो असे म्हणतात, म्हणूनच याला ७ जन्मांची साथ म्हटले जाते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.