Hindu Rituals : देवी - देवतांची प्रतिमा दान करावी की नाही? काय आहे नियम? वाचा सविस्तर

देवी-देवतेची प्रतिमा दान करावी की नाही?
Hindu Rituals
Hindu Ritualsesakal

Hindu Rituals : हिंदू धर्मात देवी-देवतांच्या पूजेला फार महत्त्व आहे, लोक अनेकदा दानधर्मही करतात, पण तुम्ही देवाची प्रतिमा किंवा मूर्ती एखाद्याला भेट म्हणून द्यावी किंवा दान करावी असा विचार करत असाल तर त्याआधी तुम्ही या काही गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. बरेच जण एखाद्याला लग्नात भेट म्हणून किंवा एखाद्या ठिकाणी दान म्हणून देवी-देवतेची प्रतिमा देतात. मात्र हे योग्य की अयोग्य याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

जर तुमच्या राहत्या जागेच्या जवळपास नवीन मंदिर बनले असेल तर तुम्ही देवी-देवतांच्या मूर्ती दान करू शकता, असे केल्याने तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळतो, यासोबतच तुम्ही तुमच्या कमाईतील काही भाग मंदिराच्या बांधकामात द्यावा, पण देवाची मूर्ती किंवा प्रतिमा एखाद्याला दान करू नये, हे करत असताना तुम्ही देवी देवतांना तुमच्यापासून दूर करता. यासोबतच देवी-देवतांची प्रतिमा कोरलेले चांदीचे शिक्केसुद्धा कोणाला दान करू नये. (culture)

Hindu Rituals
Hindu Rituals : देव बाप्पाकडे पाठ करून का उभे राहू नये? जाणून घ्या कारण

या वस्तूही कोणाला भेट म्हणून देऊ नका

कात्री, सुई, धागा, लोखंडी वस्तू चुकूनही भेट देऊ नका.

चुकूनही चामड्याच्या वस्तू कोणालाही भेट देऊ नका.

अत्तर किंवा तेल कोणालाही भेट म्हणून देऊ नका.

मनी प्लांटचे रोप कोणालाही दान करू नये असे म्हणतात.

वास्तू शास्त्रानुसार, एखाद्याने कधीही कोणालाही घड्याळ भेट देऊ नये. (Sanskruti)

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com