Hindu Temple : शंकराच्या मंदिराबाहेर नंदी आणि कासव का असतात?

प्रत्येक गोष्टीच्या कथा भरपूर असतात पण अध्यात्मिक अर्थ जाणून घ्या
Hindu Temple
Hindu Templeesakal

Why There Is A Nandi And A Turtle Out Side Of The Hindu Temple : शंकराच्या मंदिराबाहेर नेहमी आपल्याला नंदी आणि कासवाची मूर्ती दिसते. मंदिरात प्रवेश करण्याआधी लोक नंदीला आणि कासवाला नमस्कार करतात आणि मग आत जातात. काही लोक नंदीच्या कानात आपली इच्छा सांगतात. त्यांचा भाव असतो की, नंदी आपली इच्छा देवापर्यंत पोहचवेल. या मूर्त्या मंदिराच्या गाभाऱ्या बाहेर का असतात याविषयाच्या अनेक पौराणिक कथा तुम्ही कदाचित ऐकलेल्या असतील.

पण सोशल मीडीया इन्फ्लूएंसर स्वर योगी यांनी इंस्टाग्रामच्या सायबर झील या आपल्या पेजवर याविषयीची पोस्ट शेअर केली आहे.

नंदी हे शंकराचे वाहन आहे. त्यामुळे ते मंदिराबाहेर असणं सहाजिक आहे असं भाविकांना वाटतं. पण मग कासव का असतं? हे माहितीये. ते म्हणतात नंदी भक्तीचं तर कासव वैराग्याचं प्रतिक असतं. नंदी महादेवाचे खूप मोठे भक्त मानले जातात. ते स्वतः मोठे साधक आहेत असं समजलं जातं. जेव्हा शंकर भगवान बऱ्याच काळासाठी साधनेत ध्यानमग्न असत तेव्हा नंदी त्यांची वाट बघत बसत. कधी माझे स्वामी येतील आणि मला त्यांचं दर्शन होईल. मंदिराबाहेर पण नंदी असणं हे त्याचंच प्रतिक आहे. की, भक्तीभावाने तुम्ही भगवंताला आळवत रहा, एक दिवस दर्शन नक्की मिळणार. पण त्यासाठी प्रतिक्षा करावी लागते.

Hindu Temple
Hindu Rituals : प्रसाद नेहमी उजव्या हातात का घ्यावा?

तर कासव हे वैराग्याचं प्रतिक आहे. जेव्हा कासवाला बाहेरून कोणी स्पर्श करायला जातं तेव्हा ते आपले सर्व अवयव, इंद्रिय आकुंचित करून कोशात जातो. मग वरून कोणीही त्याला स्पर्श करू शकत नाही. त्याचप्रमाणे साधकाने साधना करताना आपल्या सर्व इंद्रियांच लक्ष बाहेरच्या जगाकडून आकुंचित करून आतल्या जगात वळवायचे असते. आतल्या साधनेने स्थिर व्हायचे असते.

त्यामुळे साधकाला यशस्वी होण्यासाठी भक्ती आणि वैराग्य दोन्हीची गरज आहे. एक एक गोष्टीने यश मिळणार नाही. त्यामुळे जर भगवंत प्राप्ती करायची असेल तर आधी भक्ती आणि वैराग्य पूजा म्हणजे भगवंताचं दर्शन होतं हेच या मूर्त्या दर्शवतात, असं त्यांनी पोस्टमध्ये सांगितलं आहे.

या पोस्टला लोकांनी फार मोठ्याप्रमाणात लाईक केलं आहे. उत्तम माहिती म्हणून अनेकांनी त्यावर कमंटही केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com