Holashtak 2023 : होळीच्या ९ दिवसाआधी करु नका हे ५ शुभ काम, असतात अशुभ l Holashtak 2023 bad time avoid these good work | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Holashtak 2023

Holashtak 2023 : होळीच्या ९ दिवसाआधी करु नका हे ५ शुभ काम, असतात अशुभ...

Holashtak 2023 : होळीच्या आधीच्या शुक्ल पक्ष अष्टमी तिथीपासून होळीपर्यंत होलाष्टक असतं. हा काळ अशुभ मानला जातो. या काळात कोणतेही शुभ काम करू नये. पंचांगानुसार होलाष्टकाचा प्रारंभ यंदा २७ फेब्रुवारीपासून होत आहे. होळीच्या आधीचे हे ८ दिवस असतात. होळी नंतरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुळवडपासून शुभकार्यांची सुरुवात होते.

यंदा ९ दिवसांचे होलाकाष्टक

यंदा २७ फेब्रुवारीपासून ते ७ मार्चपर्यंत होलाकाष्टक आहे. तिथीनुसार दिवस मोजले तर अष्टमीपासून ते पौर्णिमेपर्यंत असे ८ दिवस येतात. पण तेच इंग्रजी कॅलेंडरनुसार तारखा मोजल्या तर ९ दिवस होतात. या काळात कोणतेही शुभकार्य केले जात नाही.

कालावधी

 • फाल्गुन शुक्ल अष्टमी प्रारंभ २७ फेब्रुवारी मध्य रात्री १२.५८ ते २८ फेब्रुवारी मध्यरात्री २ वाजून २१ मिनीटांपर्यंत.

 • उदय तिथीनुसार २७ फेब्रुवारीला अष्टमी असल्याने तेव्हा होलकाष्टक प्रारंभ होत आहे.

 • या दिवशी सकाळी ६ वाजून ४९ पासून ते दुपारी १ वाजून ३५ मिनीटांपर्यंत भद्रा आहे.

फाल्गुन पौर्णिमा प्रारंभ ६ मार्चला संध्याकाळी ४ वाजून १७ पासून ७ मार्च ला संध्याकाळी ६ वाजून ९ मिनीटांपर्यंत आहे. उदयतिथी मान्यतेनुसार फाल्गुन पौर्णिमा ७ मार्चला असेल. त्यादिवशी होलाकाष्टक संपेन.

होलाष्टकात काय करू नये

 • याकाळात विवाह करणे वर्जित आहे.

 • या काळात सुनेची किंवा मुलीची पाठवणी करत नाहीत. होलाष्टकानंतर करावे.

 • या काळात लग्न ठरवणे, साखरपुडा असे कार्यक्रम करत नाहीत.

 • गृहप्रवेश, जावळं काढणे असे शुभ कार्य करत नाहीत.

 • या काळात कोणताही नवा प्रारंभ करत नाहीत.

या काळात काय करावे?

 • या काळात येणारे व्रत रंगभरी एकादशी, आमलकी एकादशी, प्रदोष व्रत येतं ती व्रतं आणि पूजा करावी.

 • पौर्णिमेला लक्ष्मी देवी आणि चंद्राची पूजा करावी.

 • पौर्णिमेला स्नान आणि दान करून पुण्य मिळवावे.

 • होलाष्टक मध्ये ग्रह उग्र असतात. त्यांच्या शांतीचे उपाय करावे. त्यांच्या मंत्रांचा जप करावा.

हा काळ अशुभ का मानला जातो?

होळीच्या आधीच्या फाल्गुन शुक्ल अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमा अशुभ मानल्या जातात. या काळात भक्त प्रल्हादाला मारण्याचा कट रचला गेला होता, त्यामुळे हा काळ अशुभ मानला जातो.

याशिवाय भगवान शंकराच्या क्रोधाने कामदेव भस्म झाल्यावर कामदेवाची पत्नी रतीने या आठ दिवसात पश्चाताप केला होता. अशा कथा यामागे सांगितल्या जातात.

टॅग्स :Holi