'No Holi,Hate Colors':बॉलीवूडच्या 'या' कलाकारांना धूळवड आवडत नाही कारण..

सिनेमात रंगपंचमी खेळताना धम्माल केलेले हे सेलिब्रिटी प्रत्यक्षात मात्र काही कारणांमुळे रंगपंचमी सणापासून लांब राहणं पसंत करतात.
Ranveer Sing,Kriti Sanon,Ranbir Kapoor
Ranveer Sing,Kriti Sanon,Ranbir KapoorGoogle

रंगपचमीच्या सणाची प्रत्येकजण वर्षभर वाट पाहत असतो. या दिवशी आपल्या कुटुंबासमवेत भारतभरात मोठ्या उत्साहात लोकं रंगाचा खेळ खेळतात. सर्वसामान्यच नाही तर एरव्ही स्टायलिश राहणारे सेलिब्रिटीही रंगात काळे-निळे पडलेले आपण फोटोंच्या माध्यमातनं अनेकदा पाहिलं असेल. पण याला काही सेलिब्रिटी मात्र अपवाद आहेत बरं का. हे सेलिब्रिटी सिनेमात रंगपंचमी खेळताना इतके रंगून गेलेले आपण पाहिले असाल की त्यांना पाहून तुम्हाला त्याक्षणी हातात रंग असते तर आपणही म जा लुटली असती असं वाटायला लागलं असेल बहुधा. पण हेच पडद्यावर रंगपंचमी खेळणारे सेलिब्रिटी प्रत्यक्षात मात्र रंगापांसून,रंगपंचमी सणापासून दोन हात लांब राहतात बरं का. यामध्ये रणबीर कपूर,टायगर श्रॉफ,करिना कपूर खान,रणवीर सिंग यांचा समावेश आहे.

Ranbir Kapoor
Ranbir KapoorGoogle

रणबीर कपूर

कपूर फॅमिलीत कशी होळी खेळली जाते हे आपल्या सर्वांनाच माहित असेल. लहानपणी रणबीरनंही आपले आजोबा राज कपूर यांच्या होळी पार्टीचा आनंद लुटलाच असेल. शिवाय 'ये जवानी है दिवानी' या सिनेमात दीपिकासोबत 'बलम पिचकारी' या रंगपंचमीच्या गाण्यावर ताल धरणारा रणबीर किती जणांना आवडून गेला असेल. ते गाणं पाहून वाटत होतं यानं काय मस्त या गाण्यात रंग खेळून धमाल केली असेल. पण ते सगळं फक्त सिनेमापुरतं बरं का. गेल्या अनेक वर्षांपासून रणबीर कपूरनं रंगपंचमी हा सण साजराच केला नाही. त्याला रंग आवडत नाहीत हे त्यामागचं कारण असल्याचं त्यानं एकदा मुलाखतीत सांगितलं

Ranveer Sing,Kriti Sanon,Ranbir Kapoor
Video: राज कपूर यांच्या 'Wild Holi' पार्टीत काय काय व्हायचं?
Tiger Shroff
Tiger ShroffGoogle

टायगर श्रॉफ

अॅक्शन करण्यात एक्सपर्ट असलेला टायगर श्रॉफ(Tiger Shroff) रंगपंचमी साजरी करत नाही. त्याला केमिकल रंगाची अॅलर्जी असल्यामुळे तो खूप घाबरतो. तसंच,रंगपंचमी या सणामुळे पाण्याचं मोठं नुकसान होतं असे देखील त्याला वाटते. त्यामुळेच तो रंगपंचमी सणापासून स्वतःला लांब ठेवणं पसंत करतो.

Ranveer Sing,Kriti Sanon,Ranbir Kapoor
काश्मिरी पंडितांच्या हत्येचा कट रचणारा बिट्टा कराटे कोण आहे? जाणून घ्या
Ranveer Singh
Ranveer SinghGoogle

रणवीर सिंग(Ranveer Singh)

बॉलीवूड मध्ये रंगबिरंगी अतरंगी कपडे घालत मजा-मस्ती करणारा रणवीर धुळवडीपासून लांब राहतो. त्याला वाटतं रंगांमुळे आपण सगळीकडे घाण करतो. रस्ते काळे-निळे पडतात हे त्याला आवडत नाही.

Ranveer Sing,Kriti Sanon,Ranbir Kapoor
नवऱ्याच्या पायाला गुलाल लावत मौनीनं साजरी केली लग्नानंतरची पहिली धुळवड
Kareena Kapoor,her father Randhir Kapoor.
Kareena Kapoor,her father Randhir Kapoor.Google

करिना कपूर-खान(Kareena Kapoor Khan)

करिनानं आपले आजोबा राज कपूर यांच्या निधनानंतर होळी सण कधीच साजरा केला नाही. ती आजोबा असताना रंगपंचमी पार्टीत खूप धम्माल करायची पण आजोबांच्या जाण्यामुळे करिनाने जाणीवपूर्वक स्वतःला या सणापासून दूर ठेवलं आहे.

Ranveer Sing,Kriti Sanon,Ranbir Kapoor
मराठी कलाकरांना चढला धुळवडीचा Fever! हटक्या फोटोंनी वेधलं लक्ष
Kriti Sanon
Kriti SanonGoogle

कृति सनन

कृतीला देखील होळी हा सण आवडत नाही. ती लहानपणी घरी रंगपंचमी साजरी करायची. पण आता तिला रंगांचा खेळ आवडत नाही. फक्त फिल्म प्रमोशनसाठी एकदा तिनं हाताला अनेक वर्षांनी रंग लावून फोटो शूट केलं होतं.

Ranveer Sing,Kriti Sanon,Ranbir Kapoor
शिल्पाची मुलांसोबत अनोखी फुलांची धुळवड! कलरफुल व्हिडीओ व्हायरल
John Abraham
John AbrahamGoogle

जॉन अब्राहम(Joh Abraham)

जॉन अब्राहमला केमिकल रंग आवडत नाहीत. हे रंग माणसांसोबत निसर्गाचंही नुकसान करतात असं त्याचं म्हणणं आहे. त्यामुळे तो नेहमी आपल्याला या दिवशी घरात बंदिस्त करून घेतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com