Holi 2023 : सावधान! होळीला पांढरे कपडे घालणार आहात? आधी हे वाचा l Holi 2023 Holika Dahan Astro Tips white black cloths | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Holi 2023

Holi 2023 : सावधान! होळीला पांढरे कपडे घालणार आहात? आधी हे वाचा...

Holika Dahan Astro Tips : आनंदाचा, रंगाचा आणि वाईट वृत्तीवर विजय मिळवण्याचा हा सण आहे. होळी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होते. याची पद्धत वेगवेगळ्या ठिकाणी बदलत असते. परदेशातही हिंदू लोक होळी साजरी करतात. नवीन वर्षातला पहिला सण हा होळीचा असतो. महाराष्ट्रात होळी दहन ६ मार्चला होणार आहे तर उत्तरेला ७ मार्चला.

बहुतेकदा होळीला पांढरे कपडे घालण्याचा सध्याचा ट्रेंड आहे. पण हे करणं वाईट असं ज्योतिषशास्त्र सांगते, जाणून घेऊया कारण.

या रंगांचे कपडे चुकूनही घालू नका

होळी हा सण नकारात्मक शक्तींचा अंत करून सकारात्मकता आणण्याचा दिवस आहे. सिनेमा, मालिका यात होळीला पांढरे, काळे कपडे घातलेले दाखवल्यामुळे सगळीकडे तोच ट्रेंड आला आहे. पण खरंचर ज्योतिषशास्त्रानुसार होळीला या रंगांचे कपडे घातल्याने नकारात्मकता आपण आपल्याकडे आकर्षित करतो. ती नकारात्मकता कपड्यांद्वारे आपल्या घरात शिरते. त्यामुळे नकारात्मक गोष्टींचं दहन होण्याऐवजी ते काळ्या किंवा पांढऱ्या रंगांच्या कपड्यांना चिकटून राहते.

या गोष्टींपासून दूर रहा

होळी दहनाच्या दिवशी सिगारेट, दारू, मांसाहार या गोष्टींपासून लांब रहावे, असं शास्त्र सांगते. या गोष्टींमुळे नकारात्मक भावना वाढते.

होळी पूजा करताना या गोष्टी लक्षात ठेवा

होळीची पूजा करताना आपला चेहरा उत्तर किंवा पूर्व दिशेला हवा. असं करणं शास्त्रानुसार शुभ मानलं जातं. शिवाय या दिवशी गरजूंना दान करावं.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

टॅग्स :HoliAstrology