
The Divine Story of Ganesha and His Mouse: इंद्राच्या राजसभेत "कौंच' नावाचा एक गंधर्व होता. तो गानकलेत निपुण होता. एकदा तो इंद्राच्या दरबारात गात असताना एका ऋषीकडे पाहून कुत्सित हसला. साहजिकच त्या ऋषींनी चिडून "कौंच' गंधर्वाला शाप देऊन त्याला मूषक रूपात पृथ्वीवर थेट पराशर ऋषींच्या आश्रमात पाठविले. याच आश्रमात बालगणेश पराशर ऋषींच्या देखरेखीखाली वेदविद्यांचे अध्ययन करीत होता.