
Raskha Bandhan: जगज्जेत्या सिकंदरला सुद्धा भारतीय संस्कृतीतल्या राखीचं महत्त्व कळालं होतं
रक्षाबंधनासंबंधी अनेक कथा सांगितल्या जातात. बहिणीचे रक्षण भावाने करावे, तिला सन्मानाने सुरक्षित आनंदाने जगण्यास मदत करावी हा या सणामागचा उद्देश आहे. राखी म्हणजे केवळ सुताचा दोरा नव्हे ! तर तो स्नेह, माया आणि कर्तव्याची आठवण करून देण्याचे प्रतीक आहे. ते एक पवित्र बंधन आहे.
स्त्रियाना मानसन्मान दिला पाहिजे प्रत्येकाने स्त्रीचे रक्षण केले पाहिजे. याची आठवण करून देणारा एक महत्त्वाचा सण आहे. भाऊ जर दूर रहात असेल तर बहीण त्याला पोस्टाने किंवा कुरीयरने राखी पाठवून देते. भाऊ तिला भेटवस्तू पाठवून देतो. बहीण केवळ सख्या भावालाच राखी बांधत नाही. तर रक्षण करणाऱ्या पोलिस बंधूंच्या व देशाच्या सीमेवर चौवीस तास परकियांपासून रक्षण करणाऱ्या जवानांच्या हातावर राखी बांधते
हेही वाचा: Raksha bandhan 2022 date : यंदा रक्षाबंधन कधी? तारीख आणि तिथीमधील फरक जाणून घ्या
सिकंदर जेव्हा हिंदूस्थानवर चाल करून आला, त्यावेळी तो झेलम नदीच्या किनारी पोहोचला. तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता. तेथे झेलम नदीच्या किनारी सावित्री नावाची एक स्त्री राखीची पूजा करुन झेलम नदीच्या जलदेवतेला अर्पण करीत होती. ते दृश्य पाहून सिकंदर आश्चर्यचकित झाला.त्याचे कुतुहल जागृत झाले. त्याने सावित्रीला राखीसंबंधी विचारले.
हेही वाचा: Raksha Bandhan: रक्षाबंधनला बहिणीला काय गिफ्ट देताय?
सावित्रीने राखीचे महत्व सिकंदरला सांगितले. नंतर तिने राखी सिकंदरच्या मनगटावर बांधली. त्यांचे बहीण भावाचे नाते निर्माण झाले. पुढे सिकंदरने पोरस राजावर चाल करून त्याला कैद केले. ही घटना पोरसाची सख्खी बहीण सावित्रीला कळताच , ती तत्परतेने सिकंदराकडे आली आणि तिने सिकंदरला रक्षाबंधनाची आठवण करून दिली. सिकंदरला सावित्री ही पोरसाची बहीण आहे हे कळताच, त्याने सावित्रीची क्षमा मागितली आणि पोरसाला कैदेतून मुक्त केले. तसेच त्याने पोरसाचे राज्य त्याला सन्मानाने परत दिले.
Web Title: How Great Empire Sikandar Also Get Know Imporatnace Of Indian Festival Rakhi Or Raksha Bandhan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..