
Business Prediction: यंदा 10 जूनपासून गुरू मिथुन राशीत अस्त होणार आहे. या दिवशी संध्याकाळी 7.30 वाजता गुरू मिथुन राशीत अस्त होणार आहे. 27 दिवसांसाठी गुरू अस्त अवस्थेत भ्रमण करेल आणि 9 जुलै रोजी पुन्हा उगवेल.
ज्योतिषशास्त्रानुसार असं मानलं जातं की एखाद्या ग्रहाच्या अस्तामुळे त्याची क्रिया कमी होते आणि त्याचा शुभ प्रभाव कमी होतो. परंतु यावेळी गुरूचे अस्त काही राशींसाठी खूप शुभ मानलं जातं.
मिथुन राशीत आल्यानंतर, गुरु अतिचरी चाल घेऊन फिरत होता. म्हणजेच तो त्याच्या सामान्य गतीपेक्षा अनेक पटीने वेगाने फिरत होता, ज्यामुळे गुरूने अनेक राशींच्या लोकांना तणाव आणि गोंधळात टाकले होते. आता, काही दिवसांसाठी गुरूच्या अस्तामुळे काही राशींना दिलासा मिळणार आहे. पुढील राशीच्या लोकांना व्यवसायात यश मिळणार आहे. तुमची रास कोणती हे जाणून घेऊया.