Kartik Ekadashi 2022 : कार्तिक एकादशी पूजा कशी करावी? जाणून घ्या कोणत्या मंत्राचा करावा जप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kartik Ekadashi 2022

Kartik Ekadashi 2022 : कार्तिक एकादशी पूजा कशी करावी? जाणून घ्या कोणत्या मंत्राचा करावा जप

Kartik Ekadashi 2022 : कार्तिक महिन्यात येणाऱ्या शुक्ल पक्षातील एकादशीला कार्तिक किंवा प्रबोधिनी एकादशी म्हणतात. दिवाळीनंतर ही एकादशी येते. आषाढ शुक्ल पक्षाच्या एकादशीला भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात आणि कार्तिक एकादशीला उठतात. दिवाळीनंतर येणाऱ्या तुळशी विवाहापासून इतर शुभ कार्य संपन्न होतात.

हेही वाचा: Kartiki Ekadashi 2022 : कार्तिक एकादशीला देवउठणी एकादशी का म्हणतात? जाणून घ्या

कशी करावी पूजा

आजच्या पहाटे दिवशी स्नान आटोपून दिवसभर व्रत्थ रहावे. भगवान विष्णूचे स्मरण करत पूजा करावी. भगवान विष्णूंना शंख आणि घंटा वाजवून त्यांना झोपेतून जागे करावे.

यानंतर भगवान विष्णूसमोर दिवा आणि उदबत्ती लावा. त्यानंतर त्यांना फळे, फुले आणि भोग अर्पण करावेत. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला तुळशीचा नैवेद्य दाखवावा. व्रत सोडल्यावर गोर गरीब आणि ब्राह्मणांना अन्न दान करावे.

हेही वाचा: Dev Uthani Ekadashi 2022: आज एकादशीला 'या' वस्तूंचे दान करा; आयुष्यात होईल सुखाची भरभराट

या मंत्राचा करावा जप

व्रताच्या रात्री भागवतकथा आणि विष्णू स्त्रतेत्राचे पठण करावे.तसेच, भगवान विष्णूंना जागे करण्यासाठी 'उत्तिष्ठोतिष्ठ गोविंद त्यज निद्राम जगत्पट्टे'.सत्वर सुप्ते जगन्नाथ जगसुप्तमिदं भवेत् ।उत्तमोत्तिष्ठ वराह नारायण ।हिरण्यक्ष प्राण घटीं त्रैलोक्ये मंगलम् कुरु ।श्लोकाचे पठण करावे.