Khandesh Kanubai Ranubai Festival: रोट, फुलोरा आणि ओटी... असा असतो खानदेशातील कानुबाई-राणूबाई उत्सव; श्रावणातील अनोखी परंपरा

How Kanubai-Ranubai Festival is Celebrated in Khandesh: रोट, फुलोरा आणि ओटींसह साजरा होणारा कानुबाई-राणूबाई हा खानदेशातील श्रावणी परंपरेचा भक्तिपूर्ण उत्सव आहे.
How Kanubai-Ranubai Festival is Celebrated in Khandesh
How Kanubai-Ranubai Festival is Celebrated in Khandeshsakal
Updated on

Shravan Rituals and Goddess Worship in Rural Maharashtra: श्रावण महिना अनेक सण-उत्सवांनी भरलेला असतो. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीचे सणवार साजरे केले जातात. श्रावणी सोमवार, नागपंचमी, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, मंगळागौर असे अनेक सण महाराष्ट्रात साजरे केले जातात. अशाच खानदेशातही काही पारंपारिक रूढी परंपरा आहेत, त्यापैकी एक म्हणजे कानुबाई-राणूबाई यांचा उत्सव. खानदेशवासीय या आराध्य देवतांना आपली आईच मानतात.

दरवर्षी श्रावण महिन्यात शुद्ध पक्षात नागपंचमीच्या नंतर येणाऱ्या रविवारी या देवींची विधिपूर्वक स्थापना केली जाते आणि दोन दिवस मोठ्या भक्तिभावाने हा उत्सव साजरा केला जातो. काल म्हणजेच रविवारी, ३ ऑगस्ट रोजी हा उत्सव साजरा झाला.

परंपरा आणि उत्सवाची तयारी

या उत्सवासाठी कुटुंबातील सदस्य संख्येनुसार परंपरेने ठरलेल्या मापाप्रमाणे म्हणजेच एकेक मूठ प्रत्येकी गहू मोजून घेतात आणि आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी ते घरीच दळले जातात. पूजेसाठी चौरंगावर तांदूळ पसरवून त्यावर पितळेचा सुंदर तांब्या ठेवतात. त्यात पाणी, दूध, सुपारी, पैसे घालून तांब्यावर नागवेलीची 5 पाने ठेवतात. घराच्या प्रवेशद्वाराला आणि चौरंगाला आंब्याचे तोरण लावतात. मग कानुबाई- राणूबाई म्हणून पूजले जाणारे श्रीफळ तांब्यावर ठेवतात.

How Kanubai-Ranubai Festival is Celebrated in Khandesh
Shravan Fast Recipes: श्रावणातील उपवसाला सारखं-सारखं एकच पदार्थ खाऊन कंटाळा आलाय? मग या २ रेसिपीज नक्की ट्राय करा

काही ठिकाणी त्यांचे लाकडी, पितळी किंवा मातीचे मुखवटेही असतात. त्यांना खण/साडी नेसवतात, नथ, मंगळसूत्र, चंद्रहार, ठुशी,एकदाणी, चितांग, गाठले असे पारंपरिक दागिने घालतात. त्यांची साग्रसंगीत पूजा होते. हा उत्सव दोन दिवसांचा असतो. सोमवारी कानुबाई- राणूबाई यांचे पूजा करून विसर्जन होते. उत्सव चालू असेपर्यंत देवीसमोरचा दिवा विझू देत नाहीत.

नैवेद्य

या पूजेच्या नैवेद्याचे वेगळे महत्व असते. यात खास घरी दळलेल्या गव्हाचे 'रोट' म्हणजेच पुरणपोळी ला मानाचे स्थान असते. शिवाय लाल भोपळ्याची भाजी, दही- साखर- भात, ओल्या नारळाची चटणी, कोशिंबीर, भेंडीची भाजी असा बेत असतो. या नैवेद्यात तुरीचे वरण निषिद्ध असते. जो भात केला जातो त्याला 'मोगरा' म्हणतात. शिवाय या पूजेसाठी ताजा फुलोरा म्हणजेच दळलेल्या गव्हाच्या गोड पुऱ्या तळून त्या चौरंगावर टांगल्या जातात.

How Kanubai-Ranubai Festival is Celebrated in Khandesh
Mangalagaur 2025: यंदा कधी आहे मंगळागौर? जाणून घ्या तारखा, महत्त्व आणि या व्रताचे लाभ

विशेष करून माहेरवाशिणींना या पूजेप्रसंगी खास आमंत्रण असते. त्यांची साडी चोळीने ओटी भरली जाते. इतर नातेवाईकांनाही जेवणाचे आमंत्रण असते. दुसऱ्या दिवशी खरे तर नदीवर नेऊन विसर्जनाची पद्धत आहे. पण आता सोयीनुसार घरीच विसर्जन करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com