Shravan Fast Recipes: श्रावणातील उपवसाला सारखं-सारखं एकच पदार्थ खाऊन कंटाळा आलाय? मग या २ रेसिपीज नक्की ट्राय करा

Unique Shravan Upvas Recipes in Marathi: साबुदाणा खिचडीला कंटाळा आला असेल, तर श्रावण उपवासात चवदार आणि पारंपरिक अशा या दोन रेसिपीज जरूर ट्राय करा!
Unique Shravan Upvas Recipes in Marathi
Unique Shravan Upvas Recipes in Marathisakal
Updated on

Healthy Fasting Options for Shravan Month: चातुर्मास सुरू झाला की आपल्या आहारातही बदल व्हायला लागतो; उपवास, सण-उत्सव यामुळे अनेक घरांमध्ये खास उपवासाचे आणि पारंपरिक पदार्थांचे बेत आखले जातात. साबुदाणा खिचडी आणि बटाट्याच्या वड्यांपुरतेच मर्यादित न राहता, आता अनेकजण नवनवीन, चविष्ट आणि पोषणमूल्यांनी भरलेले पदार्थ शोधू लागले आहेत. अशाच काही हटके आणि पारंपरिक असलेल्या दोन खास रेसिपीज; खमंग रताळ्याचे थालीपीठ आणि गोडसर पातोळ्या या तुमचा श्रावणतल्या उपवासाला चवदार बनवतील.

रताळ्याचे थालीपीठ

साहित्य

दोन मध्यम रताळी, वाटीभर भिजवलेला साबुदाणा, वाटीभर वरईचे तांदूळ, वाटीभर दाण्याचे कूट, 2-3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ, चवीपुरती साखर, तूप.

Unique Shravan Upvas Recipes in Marathi
Shravan Fast Recipes: चातुर्मासासाठी खास चविष्ट, पौष्टिक आणि उपासाला परफेक्ट रेसिपीज, लगेच नोट करा

कृती

वरईचे तांदूळ तीन तास भिजत ठेवावेत. रताळी उकडून घ्यावी. वरईचे चांगले भाजलेले तांदूळ निथळून मिक्‍सरवर बारीक करून घ्यावेत. मग त्या पिठात रताळी किसून घालावीत. भिजवलेला साबुदाणा दाण्याचे कूट, मीठ, बारीक केलेली मिरची, कोथिंबीर, चवीपुरती साखर घालून त्याचा गोळा करावा. तव्याला तूप लावून थालिपीठ लावावे. खमंग भाजावे. वरील साहित्यात 2-3 थालिपीठ होतील. दह्यात कालवलेल्या दाण्याची चटणी बरोबर गरमागरम थालिपीठ द्यावे.

पातोळ्या

साहित्य

दोन वाट्या वरई तांदूळ, एक वाटी काकडीचा कीस, चिमूटभर मीठ,

सारणाकरिता

दोन वाट्या खोबऱ्याचा चव, दीड ते पावणे दोन वाट्या बारीक चिरलेला गूळ, चमचाभर भाजलेली खसखस पूड, काजूची भरडपूड, वेलची, जायफळ पूड, तूप, पातोळ्या करण्यासाठी केळीची किंवा कर्दळीची पाने.

कृती

कढईत सारणाचे साहित्य घालून घट्टसर शिजवून घ्यावे. तांदूळ बेताचे पाणी घालून 2-3 तास भिजत ठेवावेत. नंतर निथळून त्यात चवीपुरते मीठ घालून ते मिक्‍सरवर बारीक वाटून घ्यावेत. त्यात काकडीचा कीस घालावा व पीठ हलवून तयार करावे. कर्दळीचे उभे पान घेऊन निम्म्या पानांवर दोन चमचे पीठ गोलाकार पसरावे. त्यावर सारण पसरावे. पानाचा उरलेला भाग त्यावर दुमडून पातोळी झाकावी. चाळणीत किंवा मोदकपात्रात ठेवून वाफवून घ्यावी. कोमट असताना काढावी व तूप घालून द्यावी.

Unique Shravan Upvas Recipes in Marathi
Shravan Upvas Special Milk-Shake: श्रावणातील उपवासासाठी बनवा खास आरोग्यदायी आणि स्वादिष्ट खजूर-अक्रोड शेक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com