Rudraksh Niyam: देवाचा प्रकोप का होतो? तुम्हीही अशा प्रकारे रुद्राक्ष घालत असल्यास ते टाळावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rudraksh Niyam

Rudraksh Niyam: देवाचा प्रकोप का होतो? तुम्हीही अशा प्रकारे रुद्राक्ष घालत असल्यास ते टाळावे

रुद्राक्षाला पृथ्वीवरील भगवान शिवाचं प्रतिक मानल्या जातं. शास्त्रानुसार रुद्राक्ष धारण करण्याचे काही महत्वाचे नियम आहेत. हे नियम न पाळल्यास तुमचे वाईट दिवस सुरू होऊ शकतात. अनेक ज्योतिष तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती बघता रुद्राक्ष धारण करण्याचा सल्ला देतात. रुद्राक्ष घातल्याने तुमचं आध्यात्माकडे लक्ष केंद्रित होते. जाणून घ्या रुद्राक्ष घातण्याचे नियम.

रूद्राक्ष घालण्याचे नियम

रुद्राक्ष धारण करण्याचे काही नियम आहेत. जो या नियमांना तोडतो त्याला भगवान शिवाच्या कोपाला सामोरे जावं लागतं असं म्हणतात.

तुम्ही धूम्रपान किंवा मांसाहार करत असाल्यास तुमचा रुद्राक्ष अशुद्ध असतो. तुम्हाला भविष्यात संकटांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे अशा लोकांना रुद्राक्ष धारण करू नये.

झोपताना रूद्राक्ष घालू नका

झोपताना रुद्राक्ष काढून ठेवावा. असे न केल्यास तुम्हाला वाइट स्वप्न पडतील. मन अशांत राहील.

रूद्राक्ष उतरवण्याची स्थिती अशी असावी

जर तुम्ही एखाद्याच्या अंत्ययात्रेत जात असाल तर रुद्राक्ष काढून ठेवावा. अशा जागेवर रुद्राक्ष काढून ठेवल्यास तो अशुद्ध होतो. त्याने तुमच्या जीवनात नकारात्मकताही येऊ शकते.

हेही वाचा: Rudraksha Niyam: चुकूनही घालू नका 'या' प्रकारचा रुद्राक्ष, जाणून घ्या रुद्राक्ष घालण्याचे नियम

असा रूद्राक्ष घालू नये

दुसऱ्या व्यक्तीचा रुद्राक्ष घालू नये. तसेच अन्य कोणासही घालण्यास देऊ नये. तसेच रुद्राक्षास अशुद्ध हाताने स्पर्श करू नये. शौचालयास जाताना किंवा दैनंदिन क्रिया करताना रुद्राक्ष काढून ठेवावा.

हेही वाचा: Rashi Bhavishya: 'या' चार राशींसाठी आजचा दिवस अशुभ

ज्योतिष्यांचा सल्ला घ्यावा

कोणाच्या म्हनण्यावरून रुद्राक्ष धारण करू नका. त्याआधी ज्योतिष्यांचा सल्ला जरूर घ्यावा. कारण राशी आणि ग्रहानुसार रुद्राक्ष माळ वेगवेगळी असू शकते. उदा. मीन, धनु आणि मेष जातीच्या लोकांसाठी पंचमुखी रुद्राक्ष उपयोगी मानल्या जाते.

डिस्क्लेमर: वरील माहिती मान्यतांच्या आधारे घेतली गेली असून सकाळ समुहाशी याचा काहीही संबंध नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

टॅग्स :Weekly Rashi Bhavishya