
Mahashivratri 2023: घरात सुख शांती आणि धनलाभ मिळवण्यासाठी महाशिवरात्रीला 'हे' उपाय करा
Mahashivratri 2023 : महाशिवरात्री हा भगवान शिव भक्तांसाठी वर्षातील सर्वात महत्वाचा सण आहे. महाशिवरात्री हा शिव आणि शक्तीच्या मिलनाचा महान सण आहे. शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला. शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवसापासून सृष्टीची सुरुवात झाली असे मानले जाते.
शिवरात्रीचे वर्णन गरुड पुराण, स्कंद पुराण, पद्मपुराण आणि अग्निपुराण इत्यादींमध्ये आढळते. असे म्हटले जाते की शिवरात्रीच्या दिवशी जो व्यक्ती बिल्वाच्या पानांसह भगवान शंकराची पूजा करतो आणि रात्री जागृत होऊन देवाच्या मंत्रांचा जप करतो, त्याला भगवान शिव आनंद आणि मोक्ष प्रदान करतात.
शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची आराधना केल्याने शिवभक्तीच्या शक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. आजच्या लेखात आपण घरात सुख शांती आणि धनलाभ मिळवण्यासाठी महाशिवरात्रीला कोणते उपाय करावे याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
1) तुम्ही योग्य प्रकारे शिवलिंगावर कच्चे तांदूळ अर्पण केले तर तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. तांदूळ अर्पण करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी घ्यावी. विशेषत: शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर तांदूळ अर्पण केल्यास कुमकुम मिसळून अर्पण केल्यास तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या दूर होऊ शकतात.
2) तुमच्या घरात अनावश्यक धनाची हानी होत असेल तर शिवरात्रीच्या दिवशी तांदळाच्या काही दाण्यांसोबत एक रुपयाचे नाणे शिवलिंगावर अर्पण करावे.
3) तुम्हाला जर का तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुमचे प्रिय बेलपत्र भगवान शंकराला अर्पण करा.
4) तुम्ही भगवान शिवाला 11 पानं अर्पण केले तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. बेलपत्र अर्पण करताना लक्षात ठेवा की त्याची पाने कोठूनही कापली जाऊ नयेत.
5) महाशिवरात्रीला दिवशी गाईला किंवा बैलाला हिरवा चारा खाऊ घातला तरी फायदा होतो.
6) समजा तुमच्या कुंडलीत ग्रह दोष असेल आणि त्याची स्थिती कमजोर असेल तर तुम्हाला अनेक नुकसान सहन करावे लागू शकते. जसे की तुम्ही नोकरीमध्ये चढ-उतार पाहू शकता. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला पाण्याने अभिषेक करून ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप केल्यास तुमच्या कामातील अडथळे दूर होऊ शकतात.
7) तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर शिवरात्रीच्या दिवशी पती-पत्नीने मिळून रुद्राभिषेक करावा आणि उत्तम आयुष्याची कामना करावी. या उपायाने तुमच्या आयुष्यातील समस्या लवकरच दूर होतील.
8) तसेच तुमच्या लग्नाला उशीर होत असेल तर देवी पार्वतीला लाल चुनरी आणि सिंदूर अर्पण करावी.जर तुम्ही विवाहित असाल तर माता गौरीला अर्पण केलेले सिंदूर थोडे वेगळे करा आणि ते नियमितपणे तुमच्या प्रार्थनेत लावा. पतीला दीर्घायुष्य मिळाल्याने तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल.
9) निरोगी राहायचे असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा. या दिवशी शिवलिंगाला दूध अर्पण केल्यास भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आरोग्य चांगले राहते. लक्षात ठेवा शिवलिंगाला तांब्याच्या भांड्यात दूध कधीही अर्पण करू नये.