Mars Transit 2023 : मार्गी मंगळ देणार मोठा लाभ, 'या' राशींवर होणार पैशांचा वर्षाव; तुमची रास कोणती? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mars Transit 2023

Mars Transit 2023 : मार्गी मंगळ देणार मोठा लाभ, 'या' राशींवर होणार पैशांचा वर्षाव; तुमची रास कोणती?

Mars Transit 2023 : ज्योतिषशास्त्रात मंगळ या ग्रहाला विशेष महत्त्वं आहे. मंगळ हा आक्रमकता, उत्साह, धैर्य, शक्ती, उर्जा, जमीन आणि विवाह यांचा कारक मानला जातो. त्यामुळे कुंडलीमधील मंगळ ग्रहाच्या स्थानालाही विशेष महत्त्व आहे. मंगळच्या स्थितीमुळे अनेक राशींच्या लोकांना व्यापार, कार्यक्षेत्र आणि धनसंपत्तीमध्ये लाभ होतो. तेव्हा आज तुमच्या राशीत काय योग आहे ते जाणून घ्या.

त्यामुळे लवकरच मंगळमुळे काही राशींना त्यांचा मेहनतीचं फळ मिळणार आहे. कारण 13 जानेवारीला मंगळ वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे काही वक्री ग्रह मार्गस्थ, तर काही ग्रह वक्री होणार आहेत. याचा परिणाम व्यक्तीच्या आयुष्यात पडणार आहे. पण मंगळ ग्रह मार्गस्थ होत असल्याने या राशींना याचा विशेष लाभ होणार आहे. या राशींमध्ये तुमची रास आहे का जाणून घ्या. (Astrology)

मीन (Pisces) 

 ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रह वृषभ राशीत मार्गस्थ होणार आहे. या स्थितीचा मीन राशीला फायदा होणार आहे. गोचर कुंडलीतील तिसऱ्या स्थानात मंगळ ग्रह मार्गस्थ होणार आहे. या स्थानाला साहस, पराक्रम आणि भाऊ-बहिणीचं स्थान मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार, या स्थितीमुळे अडकलेली कामं पूर्ण होतील. भावंडांची साथ मिळेल. तसेच नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी मानसन्मान वाढेल. (Rashi Bhavishya)

मेष (Aries) 

या काळात मेष राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल. काही कारणास्तव थांबलेले पैसे त्यांना परत मिळतील. आर्थिक क्षेत्रातील वाढीसोबतच कामाच्या ठिकाणीही प्रगती होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Horoscope 9th January : कुंभ आणि सिंह राशीच्या लोकांनी सावध राहा; जाणून घ्या तुमची रास

कर्क (Cancer)

मंगळ ग्रह मार्गस्थ होताच कर्क राशीच्या लोकांना लाभ मिळेल. मंगळ या राशीच्या 11 व्या स्थानात मार्गस्थ होणार आहे. या स्थानाला उत्पन्न आणि लाभाचं स्थान मानलं जातं. या काळात उत्पन्नात वाढ होईल. जे लोक नोकरी करतात त्यांना लाभ होईल. पदोन्नती तसेच पगारवाढ मिळू शकते. न्यायालयीन प्रकरणात यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल.

मिथुन (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांना करिअरच्या दृष्टीने काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. अडकलेले पैसे तुम्हाला मिळतील. तुम्ही कोणत्याही परीक्षेत यश मिळवू शकता. उत्पन्न वाढत राहील

कन्या (Virgo) 

या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल . या काळात धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायाशी संबंधित प्रवास फायदेशीर ठरतील. व्यावसायिक किंवा वैयक्तिक जीवनाशी संबंधित काही चांगली बातमी मिळेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामेही या कालावधीत पूर्ण होतील.

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांना मंगळाचा सकारात्मक प्रभाव जाणवेल. या लोकांना जमिनीच्या बांधकामातून मोठा फायदा होऊ शकतो. मंगळ ग्रह या राशीच्या दहाव्या स्थानात मार्गस्थ होणार असून हे स्थान नोकरी आणि कार्यक्षेत्राचं स्थान मानलं जातं. या काळात नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. विदेशात काम करण्याची संधी देखील चालून येईल. तसंच या काळात लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे.