Divorce साठी हे ग्रह आहेत जबाबदार, वैवाहिक आयुष्यात होतो कलह

ज्योतिष शास्त्रानुसार वैवाहिक जीवनातील कलहासाठी आणि घटस्फोटांसाठी पत्रिकेतील काही ग्रह जबाबदार असतात. या ग्रहांची स्थिती अनुकुल नसल्यास पती-पत्नीमध्ये तणाव वाढत जातो आणि मग ते वेगळे मार्ग निवडतात
divorce astrology prediction
divorce astrology predictionEsakal
Updated on

Divorce Astrology: अलिकडे प्रेम विवाह ही एक साधारण गोष्ट बनली आहे. भारतात India आजही अनेकजण लग्न जुळवताना तेही खास करून अरेंज मॅरेजमध्ये आधी पत्रिका पाहिली जाते. मात्र अलिकडे प्रेम विवाहात अनेक जोडपी पत्रिका पाहण्याला प्राधान्य देत नाहीत. Married LIfe and Divorce know the Astrology reasons how to keep good Relations

कुटुंबाच्या Family विरोधात असो किंवा संमतीने आता प्रेम विवाह Love Marriage करणं सोप असलं तरी ते टिकवणं मात्र कठीण झालंय. मुळातच अलिकडे लव्ह मॅलेज असो वा अरेंज, पती-पत्नीचं नाजूक नातं Relation टिकवण्यासाठी अनेक गोष्टी जबाबदार असतात. 

अलिकडे आपण पाहतो की घटस्फोटाचं प्रमाण देखील वाढत चाललं आहे. लग्नाच्या १५-२० वर्षांनंतरही जोडपी घटस्फोट घेत आहेत. तर अनेक जोडपी लग्नाला वर्ष होण्यापूर्वीच विभक्त होत आहेत.

ज्योतिष शास्त्रानुसार वैवाहिक जीवनातील कलहासाठी आणि घटस्फोटांसाठी पत्रिकेतील काही ग्रह जबाबदार असतात. या ग्रहांची स्थिती अनुकुल नसल्यास पती-पत्नीमध्ये तणाव वाढत जातो आणि मग ते वेगळे मार्ग निवडतात. 

वैवाहिक जीवनात अंतर आणणारे ग्रहयोग

सहाव्या किंवा आठव्या घरातील स्वामी सातव्या स्थानात किंवा सातव्या स्थानातील स्वामी आठव्या स्वामीसोबत राहिल्यास वैवाहिक जीवनावर परिणाम होतो. तसचं एखाद्या अशुभ ग्रहाची दृष्टी असेल आणि त्यावर कोणतीही शुभ दृष्टी नसेल तर त्याचा व्यक्तीवर प्रभाव पडू शकतो. 

जर जातकाच्या कुंडलीत मंगळ पहिल्या, चौथ्या, सातव्या, आठव्या आणि बाराव्या स्थानात इतर कोणच्यागी अशुभ ग्रहाशी संबंधीत असेल आणि सातव्य़ा ग्रहाचा स्वामी लग्न कुंडलीतील सातव्या स्थानात असेल आणि मंगळ त्याच्या बाजूने असेल तर अचानक वियोगाचा योग तयार होवू शकतो. 

हे देखिल वाचा-

divorce astrology prediction
Trip With Family : म्हणून सांगतोय, वर्षातनं एक तरी ट्रिप फॅमिलीसोबत केलीच पाहिजे!

घटस्फोटासाठी जबाबदार योग

कुंडलीतील जर ग्रहांची दशा सहाव्या, आठव्या किंवा बाराव्य़ा स्थानात असेल तर जोडीदारासोबत दुरावा निर्माण होवू शकतो किंवा घटस्फोट होवू शकतो. जर पुरुषाच्या कुंडलीत शुक्र पीडित असेल आणि स्त्रीच्या कुंडलीत मंगळ पीडित असेल तर वैवाहिक आयुष्यात समस्या निर्माण होवू शकतात. Divorce situation in kundali

जर कन्या राशीच्या कुंडलीत शनि आणि मंगळ पहिल्या आणि सातव्या स्थानात किंवा पाचव्या आणि अकराव्या स्थानात एकमेकांना पाहत असतील तर वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात.  Marriage astro tips

मंगळदोषामुळे अडचणी

सप्तम किंवा आठव्या भावात शनि आणि मंगळ या दोन्ही ग्रहांची दृष्टी वैवाहिक जीवनात  अडचणी निर्माण करते. तसचं मंगळ दुसऱ्या, चौथ्या, सातव्या, आठव्या किंवा बाराव्य भावात असेल तर प्रबळ मंगळ दोष असल्याने संसारात अडचणी येतात. Remedies for divorce in astrology

कलहासाठी जबाबदार ग्रह योग

जन्मतारखेनुसार लग्नाच्या अंदाजानुसार सूर्य, मंगळ, शनि, राहू आणि केतू हे ग्रह वियोग किंवा घटस्फोटाची स्थिती निर्माण होण्यास प्रमुख भूमिका बजावतात. यामुळे व्यक्तीला वैवाहिक जीवनात अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं अनेकदा पती पत्नीमध्ये फूट पडते.

सातव्या ग्रहातील राहूमुळे राग, दबदबा आणि वादविवाद करणारा स्वभाव राहतो. अशा स्थितीत पहिल्या पत्नीचं निधन होवू शकतं आणि दुसरा विवाह होवू शकत नाही. 

हे देखिल वाचा-

divorce astrology prediction
Family Bonding: कुटुंबातील वारंवार होणारे भांडणे टाळण्यासाठी 'या' गोष्टी करा

दुराव्याचं ज्योतिषीय कारण

ज्योतिष शास्त्रानुसार शनि, मंगळ, सूर्य , राहू आणि केती यांना नैसर्गिक पाप ग्रह म्हणजेच अशुभ ग्रह मानलं जातं तर बृहस्पति आणि शुक्र यांना नैसर्गिक शुभ ग्रह मानलं जातं.

शनि आणि राहू हे विभक्तीकरणाचं प्रतिनिधीत्व करतात. यामुळे जोडीदाराच्या मृत्यूची शक्यता असते. जर मंगळ सामिल असेल तर जोडीदारापैकी एक आक्रमक आणि क्रोधीत होत जातो ज्यामुळे नातं खराब होवू शकतं. 

सातव्या घराच्या संबंधात पुरुषांचे योग वेगवेगळे असतात. मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुरुष कुंडलीसाठी शुक्र आणि स्त्री कुंडलीसाठी मंगळ पाहणं गरजेचं असतं.

यासगळ्यानंतर चंद्र पाहणंही तितकचं महत्वाचं आहे. चंद्राच्या स्थितीशिवाय मनाची स्थिती तयार होवू शकत नाही. पुरुष कुंडलीतील शुक्रानुसार पत्नीचा स्वभाव आणि स्त्री कुंडलीतील मंगळानुसार पतीचा स्वभाव समोर येत असतो. 

या ग्रहांमुळे वैवाहिक जीवनात क्लेश निर्माण होवू शकतो किंवा पती पत्नीमध्ये घटस्फोट होवू शकतो. 

टीप- हा लेख ज्योतिषशास्त्रातील सर्वसाधारण माहितीवर आहे. यात अंधश्रद्धा पसरविण्याचा हेतू नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com