

Tarot Card Predictions May 2025: टॅरो कार्ड्सनुसार मे 2025 या महिन्याचं मुख्य कार्ड आहे ‘द हिरोफँट’. हे कार्ड स्थिरता, योग्य मार्गदर्शन आणि आध्यात्मिक उन्नतीचं प्रतीक आहे. याचा अर्थ असा की या महिन्यात लोकांना योग्य दिशा मिळेल, त्यांच्या प्रयत्नांना आधार मिळेल आणि नशिब साथ देईल. टॅरो कार्ड्सनुसार कन्या राशीसह पाच राशींसाठी हा महिना खूपच खास ठरणार आहे.
या राशीसाठी मे महिना फारच छान आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल, जे अडथळे होते ते दूर होतील. घरात प्रेम आणि शांतता राहील. जोडीदारासोबत नातं गोड राहील. महिन्याच्या मध्यात थोडं टेंशन वाटू शकतं, पण काळजी करू नका; गोष्टी हळूहळू ठीक होतील.
सिंह राशीच्या लोकांना आर्थिक सुबत्ता मिळू शकते. गुंतवणुकीतून फायदा होईल. घरात जर काही तणाव होत असेल, तर तो दूर होईल. लोक तुमचं म्हणणं समजून घेतील. फक्त कोणताही निर्णय घाईने न घेता विचारपूर्वक घ्या. या काळात तुम्ही भरपूर मेहनत कराल आणि त्याचा चांगला परिणामही दिसेल.
कन्या राशीच्या लोकांमध्ये नवचैतन्य येईल. सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांना फायदा होईल. कायदेशीर अडचणी सोडवता येतील. नोकरी करणाऱ्यांसाठीही ही वेळ फायदेशीर ठरेल. फक्त कर्ज घेण्यापासून थोडं लांब राहा. तब्येतीची काळजी घ्या. पण एकूणच करिअरमध्ये चांगली प्रगती दिसून येईल.
धनु राशीसाठी हा महिना काही नवीन संधी घेऊन येणार आहे. जे खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहेत, त्यांना आता यश मिळण्याची शक्यता आहे. काही अनिश्चित गोष्टी असल्या तरी, गुंतवणुकीतून फायदा मिळेल. करिअरमध्ये प्रगती होईल. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कुटुंबात एखादा आनंदाचा क्षण साजरा करण्याची संधीही मिळू शकते.
मीन राशीच्या लोकांना पैशाचा फायदा होईल. तुमचं बोलणं प्रभावी होईल, लोक ऐकतील. आरोग्य सुधारेल, कोर्टकचेरीत यश मिळेल. पगारवाढ, प्रमोशन किंवा आर्थिक अडचणी सोडवण्यास हा महिना मदत करेल. जोडीदारासोबतचं नातं आणखी घट्ट होईल.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.