Sita Navami To Dos: सीता नवमीच्या दिवशी करा 'हे' सोपे उपाय, दूर होईल मानसिक तणाव

How To Get Rid Of Fear And Anxiety On Sita Navami: सीता नवमीच्या दिवशी मनातील भीती व तणाव दूर करण्यासाठी हे पारंपरिक उपाय नक्की करा.
Sita Navami Remedies For Mental Stress Relief
Sita Navami Remedies For Mental Stress Relief sakal
Updated on

Benefits Of Performing Rituals On Sita Navami For Mental Peace: दरवर्षी वैशाख शुद्ध नवमीच्या दिवशी सीता नवमी साजरी केली जाते. सीता नवमी हा उत्सव माता सीतेच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. सीतेला लक्ष्मीचा अवतार मानला जातो. हा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला साजरा होतो. यंदा सीता नवमी ५ मे रोजी आहे. त्यानिमित्ताने सीता नवमीच्या दिवशी काही उपाय केल्यास चिंता, भीती आणि ताण दूर होण्यास मदत होते.

सीता नवमीला करावयाचे उपाय

प्रसिद्ध ज्योतिष पाडरमण सूरी यांच्या मते, सीता नवमीच्या दिवशी पुढील उपाय केल्यास तुमची चिंता आणि ताण तणाव दूर होतील.

- प्रभू श्रीराम आणि माता सीतेची पूजा

सीता नवमीच्या दिवशी प्रभू श्रीराम आणि माता सीतेची यांची एकत्र पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होतो.

Sita Navami Remedies For Mental Stress Relief
Sita Navami 2025 : यंदा सीता नवमी '5 मे' ला की '6 मे' ला? जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि पूजा विधी

- माता सीतेला सौंदर्य आणि शृंगाराचे साहित्य अर्पण करा

विवाहित महिलांनी माता सीतेला कुंकू, बांगड्या, फुले आणि इतर शृंगाराचे साहित्य अर्पण करावे. असे केल्याने घरातील दुःख, संकटे व मानसिक भीती दूर होते, अशी मान्यता आहे.

- पती पत्नीने एकत्र पूजा करा

प्रभू श्रीराम आणि सीतेची जोडी आदर्श दाम्पत्य मानली जाते. म्हणून या दिवशी पती- पत्नीने एकत्र त्यांची पूजा केल्यास दोघांमधील नातं मजबूत होते. ही पूजा वैवाहिक जीवनात प्रेम, समर्पण आणि समाधान वाढवते. यामुळे वैवाहिक जीवन अधिक स्थिर आणि आनंदी बनते.

- शुभ मुहूर्तावर पूजा पार पाडा

या वर्षी नवमी तिथी ५ मे रोजी सकाळी ७:३५ पासून सुरू होऊन ६ मे रोजी सकाळी ८:३९ वाजेपर्यंत राहणार आहे. परंतु उदया तिथीनुसार ५ मे हा मुख्य पूजेसाठी योग्य दिवस आहे. त्यामुळे सकाळी अंघोळ करून, स्वच्छ कपडे परिधान करून योग्य मुहूर्तात पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते.

वृद्धी योग आणि वाणिज करण

यंदा सीता नवमीला वृद्धी योग्य आणि वाणिज करण या दोन शुभ योगांचा संगम होत आहे. वृद्धी योग जीवनात प्रगती व भरभराटीसाठी शुभ असून, वाणिज करण व्यापार व आर्थिक व्यवहारांसाठी लाभदायक मानले जाते.

या दोन्ही योगांमुळे ५ मेचा दिवस व्यवसायिक निर्णय घेण्यासाठी, नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी अत्यंत अनुकूल ठरणार आहे. या दिवशी सुरु केलेले कार्य यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते.

Sita Navami Remedies For Mental Stress Relief
Ram Navami 2025: 'या' गावात का साजरा होतो राम आणि सीतेचा विवाह?

सीता नवमीची वेळ

वैदिक शास्त्रानुसार नवमी तिथी ५ मे रोजी सकाळी ७:३५ वाजता सुरु होईल आणि ६ मे रोजी सकाळी ८:३९ वाजता संपेल. उदया तिथीनुसार ५ मे रोजीच सीता नवमी साजरी केली जाईल.

सीता नवमीच्या निमित्ताने श्रद्धेने पूजा केल्यास संकटांचे निवारण होते व जीवनात स्थैर्य लाभते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com