
नरक चतुर्थी हा सण आपण दरवर्षी दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी व धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी साजरा करीत असतो. नरक चतुर्थीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने जर का सूर्य राक्षसाचा वध केला होता. आणि तेव्हापासून दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी आपण नरक चतुर्थी साजरी करीत असतो. नरक चतुर्थी या सणापासून आपल्याला स्वतःच्या सुखापेक्षा इतरांची सुख आणि त्याचा आनंद नेहमी शीर्षस्थानी असावा अशी शिकवण मिळत आहे. नरक चतुर्दशी हा दीपावली या सणाचा दुसरा दिवस आहे. दीपावली या सणांमध्ये असणाऱ्या पाच दिवसांपैकी नरक चतुर्थी या दिवसाला खूप महत्त्व आहे. नरक चतुर्थीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला खूप महत्त्व आहे. नरक चतुर्थीच्या दिवशी अभ्यंग स्नान करण्यात येते.
कार्तिक महिन्यांच्या कृष्णा पक्षाला चतुर्दशीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते. या दिवशी भगवान कृष्णाची आणि काली मातेची पूजा केली जाते. तसेच या दिवशी यमदेवतेचीही पूजा केली जाते.कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथि सुरूवात : 23 ऑक्टोबर 2022 सांयकाळी 06 वाजून 03 मिनिटापर्यंत चतुर्दशी तिथि समाप्ती : 24 ऑक्टोबर 2022 सांयकाळी 05 वाजून 27 मिनिटापर्यंत नरक चतुर्दशीचा मुहूर्त आहे.
तिथी : 24 ऑक्टोबर 2022, सोमवार स्नान मुहूर्त: 24 ऑक्टोबर 2022, सकाळी 05:08 - सकाळी 06:31 काली चौदस 2022 तिथि आणि मुहूर्त: 23 ऑक्टोबर 2022, रविवार रात्री 11:42 ते 24 ऑक्टोबर 2022 रात्री : 12:33 पर्यत
श्रीमद्भागवतपुराणात अशी एक कथा आहे – पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर किंवा नरकासुर या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करत होता. देव आणि मानव यांना तो फार पीडा देऊ लागला. हा दुष्ट दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला. त्याने जिंकून आणलेल्या सोळा सहस्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडून ठेवले आणि त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला. त्यामुळे जिकडेतिकडे हाहाःकार उडाला. श्रीकृष्णाला हे वृत्त समजताच सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार करून सर्व राजकन्यांना मुक्त केले. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला, ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्विन वद्य चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले. चतुर्दशीच्या पहाटे नरकासुरास ठार करून त्याच्या रक्ताचा टिळा कपाळास लावून श्रीकृष्ण घरी येताच मातांनी त्याला आलिंगन दिले. स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त केला.
आदल्या रात्री 12 वाजल्यापासूनच वातावरण दूषित लहरींनी युक्त असे बनू लागते; कारण या तिथीला ब्रह्मांडातील चंद्रनाडीचे सूर्यनाडीमध्ये स्थित्यंतर घडून येते. या स्थित्यंतराचा अपेक्षित असा लाभ पाताळातील वाईट शक्तींकडून उठवला जातो. पाताळातून प्रक्षेपित होणार्या नादयुक्त कंपन लहरी वातावरणात त्रासदायक अशा ध्वनीची निर्मिती करतात. या ध्वनीची निर्मिती लहरींतील रज-तमात्मक कणांच्या हालचालींतून उत्पन्न झालेल्या ऊर्जेतून केली जाते. या लहरी विस्फुटित लहरींशी संबंधित असतात. या लहरींतील ध्वनीकंपनांना आवर घालण्यासाठी पहाटेच्या वेळी अभ्यंगस्नान करून तुपाचे दिवे लावून दीपाची मनोभावे पूजा करतात. यामुळे दीपातून प्रक्षेपित होणार्या तेजतत्त्वात्मक लहरींच्या माध्यमातून वातावरणातील त्रासदायक लहरींतील रज-तम कणांचे विघटन केले जाते. या विघटनात्मक प्रक्रियेमुळे अनेक सूक्ष्म शक्तींच्या कोषांतील रज-तम कणही विरघळले जातात आणि वाईट शक्तींच्या भोवती असलेले संरक्षककवच नष्ट होण्यास साहाय्य होते. यालाच ‘अनिष्ट शक्तींचा वातावरणात दिपाच्या साहाय्याने झालेला संहार’ असे म्हणतात
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.