Navratri 2023 : नवरात्रीला गरबा दांडियासाठी ट्राय करा या लेटेस्ट डिझायनर लेहंगा चोली, दिसाल हटके

गरबा नाइटसाठी तुम्ही आउटफिट अजून घेतले नसतील तर तुम्ही इथून क्लासी, ट्रेंडी आणि ट्रॅडिशनल ड्रेसेससाठी आयडियाज घेऊ शकता
Navratri 2023
Navratri 2023esakal

Navratri 2023 : नवरात्रीच्या उत्सवात तरुणांमध्ये गरबा, दांडियाची विशेष क्रेझ दिसून येते. महिला मंडळी अगदी महिन्याभरापासून ज्वेलरी आणि दांडियासाठीच्या स्पेशल लुकसाठी साहित्य गोळा करण्यात व्यस्त असतात. गरबा नाइटसाठी तुम्ही आउटफिट अजून घेतले नसतील तर तुम्ही इथून क्लासी, ट्रेंडी आणि ट्रॅडिशनल ड्रेसेससाठी आयडियाज घेऊ शकता.

तुम्हाला मिरर वर्क लेहंगा चोली आवडत असेल तर तुम्ही जान्हवी कपूर स्टाइल हा ट्रॅडिशनल ड्रेस ट्राय करू शकता. लाइट रंगाच्या या लेहंग्यासोबत जान्हवीने मोठे इयररिंग, हातात बांगड्या लुज बन असा एकंदरित लुक केलाय.

गरबा आणि दांडियासाठी बहुतेक महिलांची पहिली चॉइस असते ती गरब्यासाठीचा पारंपारिक पोषाख. हे आऊटफिट कलरफुल असण्याबरोबरच अंगावर उठून दिसणारे आहे. रात्री दांडिया खेळताना हा ड्रेस उठून दिसतो. कॉटन फॅब्रिकसह मिरर वर्क असणारा हा लेहंगा तुम्ही ऑनलाइसुद्धा मागवू शकता.

फ्लोरल प्रिंट

तुम्हाला फ्लोरल प्रिंटचा लेहंगा आवडत असेल तर कतरिना स्टाइल डार्क ब्लू आणि व्हाइट कलर कॉम्बिनेशनचा लेहंगा तुम्ही ट्राय करू शकता. शिफॉन किंवा सिल्क फॅब्रिकमध्ये फ्लोरल प्रिंटचा लेहंगा फार छान दिसतो.

गुलाबी रंगाच्या लेहंग्यामध्ये अभिनेत्री सारा अली खान फार सुंदर दिसते. तुम्हीसुद्धा या स्टाइलचा लेहंगा ट्राय करून डान्स फ्लोअरवर हटके दिसू शकता.

आलियाचा हा गुलाबी लेहंगा गरबा नाइटमध्ये घालण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. यावर इम्ब्रॉयडरी आणि जरी वर्क केलेले आहे. तुम्हीसुद्धा या कलरचा लेहंगा कॅरी करू शकता. हा लेहंगा रॉयल लुक देतो.

लाल रंगाचा सारा अली खानचा हा लेहंगा फेस्टिव्हल लुकसाठी अगदी परफेक्ट आहे. कॉटन किंवा सिल्क फॅब्रिकच्या धाग्यांवर केलेले जरीचे कोरीव काम या लेहंग्याला रॉयल लुक देतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com