esakal | मुंबई : नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलीस सतर्क | Navratri festival
sakal

बोलून बातमी शोधा

Navratri festival

मुंबई : नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलीस सतर्क

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वडाळा : नवरात्रोत्सवाच्या (Navratri festival) पार्श्वभूमीवर प्रवाशांची सुरक्षितता (commuters safety) लक्षात घेऊन सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्याच्या (CSMT police) कार्यक्षेत्रातील सीएसएमटी मेन लाईन येथे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण भगत (Pravin bhagat) यांच्या मार्गदर्शनाखाली आज विशेष तपासणी करण्यात आली.

हेही वाचा: इमारतीतील छत कोसळून दोन जखमी; माटुंगा लेबर कॅम्पमधील घटना

रेल्वे स्थानक परिसरातील अडगळीच्या जागा, फलाट, कचराकुंड्या, बुकिंग हॉल, कॅंटीन, स्टेशन परिसर, पार्किंग, स्वच्छतागृह येथे लोहमार्ग पोलिसांनी काटेकोरपणे तपासणी केली. सीएसएमटी रेल्वे पोलिस ठाण्याचे निरीक्षक मनोजकुमार माने, उपनिरीक्षक तानाजी भांडवलकर व सहा पोलिस अंमलदार, मुख्यालय घाटकोपर येथील बीडीडीएस व श्वानपथक, कुमार माने, नीलेश भांडवलकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक मंगेश साळवी, दिलीप जाधव, मंगेश आयरे, ईश्वर जाधव आदींचा यात सहभाग होता.

loading image
go to top