Navratri Festival : घटस्थापनेला दुग्धशर्करा योग, चुकवू नका 'हा' महत्वाचा मुहूर्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navratri Festival

Navratri Festival : घटस्थापनेला दुग्धशर्करा योग, चुकवू नका 'हा' महत्वाचा मुहूर्त

Navratri Festival : अधर्मावर धर्माच्या विजयाचे आणि असत्यावर सत्याच्या जयाचे प्रतिक मानले जाते. आदिशक्तीच्या प्रत्येक रूपाच्या कृपेने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. देवी आपल्या भक्तांना आनंद, शक्ती आणि ज्ञान प्रदान करते, अशी श्रध्दा असते. महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, ओरिसा, आसाम, बिहार आणि यूपीसह देशातील अनेक राज्यांमध्ये नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो.

हेही वाचा: Navratri 2022: नवरात्रीचे नऊ रंग आणि महत्व

हिंदू कॅलेंडरनुसार, नवरात्रीची (Navratri 2022) सुरुवात अश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीपासून होते आणि नवमी तिथीपर्यंत चालू राहते. याला शारदीय नवरात्री असेही म्हणतात. नवरात्रीत नऊ दिवस आदिशक्तीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. पहिल्या दिवशी घटाची स्थापना केली जाते. विशेष म्हणजे या वर्षी शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एक विशेष योगायोग होत असल्याने या दिवसाचे महत्त्व वाढत आहे. जाणून घ्या शारदीय नवरात्रीचे शुभ मुहूर्त आणि इतर खास गोष्टी

हेही वाचा: Navratri : पहा अपूर्वा नेमळेकरचा जया गौरी दुर्गा परमेश्वरी अवतार

शुक्ल आणि ब्रह्म योगाचा अप्रतिम संगम

यंदा शारदीय नवरात्रीला शुक्ल आणि ब्रह्मयोगाचा अप्रतिम संगम घडत आहे. हिंदू कॅलेंडरनुसार २६ सप्टेंबरला म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी ८ वाजून ६ मिनिटांपर्यंत शुक्ल योग राहील. यानंतर ब्रह्मयोग सुरू होईल. ज्योतिषशास्त्रात शुक्ल आणि ब्रह्मदेवाची पूजा करणे शुभ मानले जाते.

हेही वाचा: Navratri: घटस्थापनेला विठुमाऊलीचं मंदिर सजलं, पाहा आकर्षक सजावट

शारदीय नवरात्री २०२२ कधी सुरू होईल?

यावर्षी २०२२ मध्ये शारदीय नवरात्रीची सुरुवात २६ सप्टेंबरपासून होणार असून ती ५ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. वर्षभरात चार नवरात्र असतात, त्यापैकी दोन गुप्त आणि दोन प्रवेश नवरात्र असतात. शारदीय नवरात्रीमध्ये दोन अतिशय शुभ संयोग होत आहे.

हेही वाचा: Navratri 2021 : कुलस्वामिनीच्या दर्शनाची भाविकांना आस

शुक्ल योग २५ सप्टेंबर रोजी (नवरात्रीचा आदला दिवस) सकाळी ९ वाजून ६ मिनिटे ते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजून ६ मिनिटांपर्यंत राहील. हाच ब्रह्मयोग २६ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ८ वाजून ६ मिनिटांपासून तयार होत आहे, जो दुसऱ्या दिवशी २७ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजून ४४ मिनिटांपर्यंत राहील.

Web Title: Navratri Festival Ghatsthapana Shubha Yog Muhurta And Importance

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..