New Year 2023: नव्या वर्षात केतू बदलणार दिशा! या राशीचं नशीब असणार जोरावर; तुमची रास कोणती? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New Year 2023

New Year 2023: नव्या वर्षात केतू बदलणार दिशा! या राशीचं नशीब असणार जोरावर; तुमची रास कोणती?

New Year Horoscope: नवे वर्ष सुरू होण्यास मोजके दहा दिवस उरले असून ज्योतिष शास्त्रानुसार नव्या वर्षात लोकांच्या नशीबात काय घडणार आहे हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागलेली आहे. मानवी जीवनात ग्रह नक्षत्रांना फार महत्व आहे. तेव्हा नव्या वर्षात तुमच्या ग्रहांच्या दिशेत काय कायापालट होणार आहे ते जाणून घेऊया.

केतू एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी 18 महिन्यांचा वेळ घेतो. यावेळी केतू कन्या राशीत विराजमान असणार आहे. सोबतच ऑक्टोबर 2023 मध्ये केतू तुळा राशीत प्रवेश करेल. ज्यामुळे अनेक राशींना लाभ होणार आहे. तर काही राशींना यामुळे नुकसानही भोगावे लागणार आहे. चला तर कोणत्या राशींची काय स्थिती असणार आहे ते जाणून घेऊया.

१. वृषभ - हा काळ या राशीसाठी चांगला असणार आहे. लाँग टूरचा प्लान करत असला तर तुमचा प्रवास यशस्वी होईल. करियर क्षेत्रातील तुमच्या प्लानिंगला यश मिळेल. आर्थिक लाभ होईल. जुनी सगळी कामे मार्गी लागतील. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला ठरेल.

२. सिंह - या राशीसाठी देखील हा काळ शुभ असणार आहे. कुटुंबात शांतीपूर्वक वातावरण असेल. कुटुंबातील नाते आणखी चांगले होईल. समाजात मान सन्मानात वाढ होईल. संपत्तीच्या गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला असेल. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांची मदत प्राप्त होईल. बिजनेसमध्ये मेहनत घ्याल तर यश मिळेल.

हेही वाचा: New Year Upay: नव्या वर्षात राशीनुसार करा हे उपाय; वर्षभर राहील लक्ष्मी मातेची कृपा

३. धनु - या राशींच्या लाोकांसाठी करियर क्षेत्रात चांगल्या संधी असतील. कार्यक्षेत्रात यश मिळेल. तुमचा धार्मिक कार्यात रस वाढेल. कोर्टाच्या कार्यात यश मिळेल. दीर्घकाळापासूनच्या आजारातून मुक्तता मिळेल. बिजनेसमध्ये मोठा फायदा होईल.

हेही वाचा: New Year 2023: यंदा 13 महिन्यांचं असणार हिंदू कॅलेंडर! तब्बल 19 वर्षांनी जुळून आला दुर्मिळ योग

४. मकर - तुम्हाला कमावण्याचे आणखी काही मार्ग मिळतील. आर्थिक विकास होईल. मित्रांसोबत संबंध सुधारेल. नवा व्यापार सुरू करण्यासाठी चांगला काळ आहे. नव्या बिजनेसमध्ये लाभ होईल.