

Numerology: Never Lose These 3 Mulank Friends! They Stand by You in Tough Times
eSakal
अंकशास्त्रानुसार, काही मूलांक असलेल्या व्यक्ती मैत्री आणि नाती अगदी प्रामाणिकपणे जपतात. चला, जाणून घेऊया मूलांक 1, 8 आणि 9 असलेल्या व्यक्तींच्या स्वभावाची खास वैशिष्ट्ये.
कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो. अंकशास्त्रानुसार, या मूलांकाचा संबंध सूर्याशी जोडला जातो. सूर्य हा ऊर्जा, शक्ती आणि जीवनाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे मूलांक 1 असलेल्या व्यक्ती आत्मविश्वासू आणि नेतृत्व करण्याची क्षमता असणाऱ्या मानल्या जातात.
तसेच या व्यक्तींना नात्यांमध्ये स्पष्टपणा आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा वाटतो. समोरच्या व्यक्तीनेही आपल्याशी तितक्याच विश्वासाने वागावे, अशी त्यांची अपेक्षा असते. कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवला, तर त्या व्यक्तीच्या मदतीसाठी ते पुढे येऊ शकतात. मात्र, खोटेपणा आणि फसवणूक त्यांना अजिबात आवडत नाही. एखाद्या व्यक्तीने आपली फसवणूक केल्याचे समजल्यास त्यांच्या मनात त्या व्यक्तीबद्दल नाराजी निर्माण होऊ शकते. त्यामुळे त्यांच्याशी प्रामाणिकपणे वागल्यास नात्यातील विश्वास टिकून राहण्यास मदत होते.