

Why some mulank people Face Discrimination Early in Life later become successful
esakal
Numerology Prediction : अंकशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेचा त्याच्या नशिबावर आणि स्वभावावर खोलवर परिणाम होत असतो. काही विशिष्ट मुलांकांचे लोक असे असतात ज्यांना सुरुवातीच्या आयुष्यात किंवा सामाजिक स्तरावर वारंवार भेदभावाचा आणि अन्यायाचा सामना करावा लागतो. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे किंवा वेगळ्या विचारसरणीमुळे समाजात अनेकदा त्यांचा अपमान केला जातो किंवा त्यांना कमी लेखले जाते. मात्र हेच लोक संघर्षातून तावून सुलाखून निघतात आणि करियरमध्ये अशा काही उंची गाठतात की जग पाहतच राहते. अपमानाचा बदला हे लोक शब्दांनी नाही, तर आपल्या यशाने आणि अफाट श्रीमंतीने देतात.