

Poweful mulank Success After 25, Numerology Life Changes
esakal
Astrology Prediction News : अंकशास्त्र (Numerology) हे केवळ आकड्यांचे गणित नसून, मानवी जीवनाचे रहस्य उलगडणारे एक अद्भूत शास्त्र आहे. आपल्या जन्मतारखेवरून ठरणाऱ्या मूलांकामध्ये आपल्या भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याची गुपिते दडलेली असतात. काही लोकांचे बालपण अत्यंत सुखात जाते, तर काहींना सुरुवातीच्या काळात पावलापावलावर संघर्ष करावा लागतो. अंकशास्त्रात अशा २ विशेष मूलांकांचा उल्लेख आढळतो, ज्यांच्या नशीबात सुरुवातीला प्रचंड अपयश, मानसिक आणि आर्थिक त्रास लिहिलेला असतो; परंतु जसे हे लोक आपल्या वयाची २५ वर्षे पूर्ण करतात, तसे त्यांचे ग्रह फिरतात. पंचवीस वयानंतर त्यांच्या आयुष्यात कमालीचा सकारात्मक बदल होतो, नशिबाची दारे उघडतात आणि ते स्वतःच्या मेहनतीने लखपती बनण्याचा मान मिळवतात.