आजचे पंचांग आणि दिनविशेष 08 जानेवारी 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchang
आजचे पंचांग आणि दिनविशेष 08 जानेवारी 2022

आजचे पंचांग आणि दिनविशेष 08 जानेवारी 2022

पंचांग -

शनिवार : पौष शुद्ध ६, चंद्रनक्षत्र उत्तराभाद्रपदा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय सकाळी ११.३७, चंद्रास्त रात्री ११.५२, सूर्योदय ७.१०, सूर्यास्त ६.१२, बांगरषष्ठी, भारतीय सौर पौष १८ शके १९४३.

दिनविशेष -

१९७३ - ‘सकाळ’ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक डॉ. ना. भि. तथा नानासाहेब परुळेकर यांचे पुण्यात निधन.

२००० - स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची १९९९ साठीच्या आंध्र प्रदेश सरकारच्या एन. टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी निवड.

२००३ - राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या (एनएफएआय) गोदामाला (व्हॉल्ट) लागलेल्या आगीमध्ये जुन्या काळातील ६२३ लहान मोठ्या चित्रपटांची १६९९ रिळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

२००९ - सातव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना, अभिनेता शशी कपूर आणि अभिनेत्री हेमामालिनी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान.

२०१३ - अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने सलग चौथ्यांदा वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा ‘बॅलन डीओर’ पुरस्कार पटकावला.

२०१५ - भारतातील ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी अतुल खरे यांची संयुक्त राष्ट्रसंघातील (युनो) शांतिसेनेचे मदत अधिकारी म्हणून नियुक्ती.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :marathiAstrology
loading image
go to top