
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 जानेवारी 2022
पंचांग -
सोमवार : पौष कृष्ण ६, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या/तूळ, चंद्रोदय रात्री १२.०३, चंद्रास्त सकाळी ११.२५, सूर्योदय ७.१०, सूर्यास्त ६.२२, भारतीय सौर माघ ४ शके १९४३.
दिनविशेष -
२००९ - मुंबईवरील हल्ल्यात हुतात्मा झालेले हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, मेजर संदीप उन्नीकृष्णन आणि हवालदार गजेंद्रसिंग यांना, तसेच दहशतवादी कसाब याला जिवंत पकडताना हुतात्मा झालेले तुकाराम ओंबाळे यांना ‘अशोकचक्र’. मुंबईतील छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानक पोलिस ठाण्याचे निरीक्षक शशांक शिंदे, तसेच अरुण चित्ते, अंबादास रामचंद्र पवार, मुकेश भिकाजी जाधव यांना मरणोत्तर ‘कीर्तिचक्र’.
२०१३ - जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी केलेल्या विशेष कामगिरीबद्दल राष्ट्रीय रायफल्सचे मेजर अभूप जे. मंजाली यांना कीर्तिचक्र जाहीर
२०१५ - कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ‘जनस्थान पुरस्कार’ ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अरुण साधू यांना जाहीर.
Web Title: On This Day Happened Today Panchang History In Marathi 24 January 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..