आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 सप्टेंबर 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang

पंचांग - रविवार : भाद्रपद कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी सिंह/कन्या, चंद्रोदय स. ६.३५, चंद्रास्त सायं. ६.२१, सूर्योदय ६.२५, सूर्यास्त ६.२७, सर्वपित्री दर्श अमावास्या, भादवी पोळा, अमावास्या श्राद्ध, अमावास्या प्रारंभ प. ३.१३, भारतीय सौर आश्‍विन ३ शके १९४४.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 सप्टेंबर 2022

पंचांग -

रविवार : भाद्रपद कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी सिंह/कन्या, चंद्रोदय स. ६.३५, चंद्रास्त सायं. ६.२१, सूर्योदय ६.२५, सूर्यास्त ६.२७, सर्वपित्री दर्श अमावास्या, भादवी पोळा, अमावास्या श्राद्ध, अमावास्या प्रारंभ प. ३.१३, भारतीय सौर आश्‍विन ३ शके १९४४.

दिनविशेष -

  • १९९७ - रशियाच्या मीर अवकाश स्थानकासाठी लागणारी मदत घेऊन अमेरिकेचे ‘ॲटलांटस’ हे अवकाशयान फ्लोरिडा येथील केप कॅनव्हेराल येथून अंतरिक्षात झेपावले.

  • २०११ - केनियाच्या पॅट्रिक मकावने बर्लिन मॅरेथॉन २ तास ३ मिनिटे ३८ सेकंद अशा जागतिक विक्रमी वेळेसह जिंकली. या शर्यतीच्या निमित्ताने मॅरेथॉन आणि दीर्घ पल्ल्याच्या शर्यतीत आफ्रिकन देशांच्या धावपटूंची मक्तेदारीच सिद्ध झाली.

  • २०१४ - भारताच्या स्वर्णसिंगने आशियाई क्रीडा रोइंगमधील सिंगल स्कल प्रकारात ब्राँझपदक पटकाविले.

  • २०१५ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेले लंडनमधील घर राज्य सरकारच्या ताब्यात आले.