आजचे पंचांग आणि दिनविशेष - 29 सप्टेंबर 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 29 सप्टेंबर 2022

पंचांग

गुरुवार : आश्‍विन शुद्ध ४, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्‍चिक, चंद्रोदय सकाळी ९.२०, चंद्रास्त रात्री ८.५४, विनायक चतुर्थी, भारतीय सौर आश्‍विन ७ शके १९४४.

दिनविशेष

२००१ : राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ऑल इंग्लंड विजेता पी. गोपीचंद याला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान.

२००७ : पुण्याचा ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे याने आशियायी बुद्धिबळ स्पर्धेत ब्रॉँझपदक जिंकले.

२०१४ : भारताच्या सानिया मिर्झा आणि साकेत मैनेनी जोडीने मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकाविले.