Fri, Sept 29, 2023

आजचे पंचांग आणि दिनविशेष ३ सप्टेंबर २०२२
Published on : 3 September 2022, 1:06 am
पंचांग
शनिवार : भाद्रपद शुद्ध ७, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्चिक, चंद्रोदय दुपारी १२.२७, चंद्रास्त रात्री ११.४६, ज्येष्ठा गौरी आवाहन दिवसभर, भारतीय सौर भाद्रपद १२ शके १९४४.
दिनविशेष
२००३ ः टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. रा. न. अरळीकट्टी यांना राष्ट्रीय संस्कृत पंडित पुरस्कार जाहीर.
२००३ ः प्रख्यात काश्मिरी कवी रहमान राही यांना मध्य प्रदेश सरकारचा ‘कबीर सन्मान’ जाहीर.
२०१४ ः मुंबई महापालिकेने मोडकसागर धरणात ‘लेक टॅपिंग’चा प्रयोग यशस्वी केला.
२०१७ ः निर्मला सीतारामन यांच्याकडे संरक्षणमंत्रिपदाची जबाबदारी सोपविली. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतरच्या त्या दुसऱ्या महिला संरक्षणमंत्री ठरल्या आहेत, तसेच पूर्णवेळ संरक्षणमंत्रिपद सांभाळणाऱ्या त्या पहिल्याच महिला ठरल्या.