आजचे पंचांग आणि दिनविशेष - 31 जुलै 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Today Panchang

पंचांग - रविवार : श्रावण शुद्ध ३, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय स. ८.१२, चंद्रास्त रा. ९.१०, सूर्योदय ६.१३, सूर्यास्त ७.०८, आदित्य पूजन, मधुस्रवा तृतीया, मुस्लिम नूतन वर्षारंभ, भारतीय सौर श्रावण ९ शके १९४४.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 31 जुलै 2022

पंचांग -

रविवार : श्रावण शुद्ध ३, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय स. ८.१२, चंद्रास्त रा. ९.१०, सूर्योदय ६.१३, सूर्यास्त ७.०८, आदित्य पूजन, मधुस्रवा तृतीया, मुस्लिम नूतन वर्षारंभ, भारतीय सौर श्रावण ९ शके १९४४.

दिनविशेष -

  • १९९२ - जागतिक कीर्तीचे सतारवादक पं. रविशंकर यांना आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचा ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार जाहीर.

  • २००६ - वरिष्ठ सरकारी अधिकारी असूनही सरकारी यंत्रणेतीलच भ्रष्टाचाराविरोधात जनतेला संघटित करणारे अरविंद केजरीवाल यांना ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार जाहीर.

  • २००८ - महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात माडिया गोंडांसाठी रुग्णालय आणि शाळा चालविणाऱ्या डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे या दांपत्याला ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार जाहीर.

  • २०१५ - देशातील प्रमुख शास्त्रज्ञ के.पी.एस. मूर्ती यांची संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडीओ) हाय एनर्जी मटेरिअल्स रिसर्च लॅबोरेटरीच्या (एचईएमआरएल) संचालकपदी नियुक्ती.