Panchang Today: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जानेवारी 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang 4th January 2023

पंचांग - बुधवार : पौष शुद्ध १३, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय दुपारी ४, चंद्रास्त पहाटे ५.४४, सूर्योदय ७.०९, सूर्यास्त ६.०९, प्रदोष, भारतीय सौर पौष १४ शके १९४४.

Panchang Today: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जानेवारी 2023

पंचांग -

बुधवार : पौष शुद्ध १३, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय दुपारी ४, चंद्रास्त पहाटे ५.४४, सूर्योदय ७.०९, सूर्यास्त ६.०९, प्रदोष, भारतीय सौर पौष १४ शके १९४४.

दिनविशेष -

 • १८०९ - अंधांसाठी उपयोगी ठरलेल्या ब्रेल लिपीचा जनक लुई ब्रेल यांचा पॅरिसमध्ये जन्म.

 • १८१३ - लघुलिपीचा संशोधक आयझॅक पिटमनचा इंग्लंडमध्ये जन्म.

 • १८८१ - ‘केसरी’ वृत्तपत्र पुणे येथे लोकमान्य टिळक यांनी सुरू केले.

 • १९०७ - युगप्रवर्तक गुजराती कादंबरीकार, कवी व विचारवंत गोवर्धनराव माधवराम त्रिपाठी यांचे मुंबईत निधन.

 • १९०८ - महाराष्ट्रातील एक विचारवंत आणि धैर्यवान कर्ते सुधारक, संस्कृतचे प्राध्यापक राजारामशास्त्री भागवत यांचे मुंबईत निधन.

 • १९०९ - नामवंत मराठी लेखक, विचारवंत, पत्रकार प्रभाकर पाध्ये यांचा जन्म.

 • १९४८ - ब्रह्मदेशामध्ये प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले.

 • १९६३ - सवाई गंधर्व पुण्यतिथी महोत्सवात झाकिर हुसेन या अकरा वर्षांच्या मुलाच्या तबलावादनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.

 • १९९४ - गेली अनेक तपे आपल्या सुमधुर संगीताने रसिकांना मंत्रमुग्ध करणारे विख्यात संगीत दिग्दर्शक राहूलदेव (आर.डी.) बर्मन ऊर्फ ‘पंचमदा’ यांचे निधन.

 • १९९६ - कलकत्ता येथील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या भारतीय भाषा परिषदेचा पुरस्कार मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक चंद्रकांत खोत यांच्या ‘बिंब-प्रतिबिंब’ या कादंबरीला मिळाला.

 • २००१ - सलग सतरा वर्षांच्या अथक संशोधनानंतर संपूर्ण भारतीय बनावटीच्या हलक्‍या लढाऊ विमानाची चाचणी यशस्वी.

 • २०१६ - मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एच. टी. भंडारी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात कल्याणच्या के. सी. गांधी स्कूलच्या प्रणव धनावडे याने नाबाद ६५२ धावांची विक्रमी खेळी केली. क्रिकेटच्या इतिहासात ही सर्वोच्च धावसंख्या होती.