आजचे पंचांग आणि दिनविशेष - 8 ऑक्टोबर 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang

पंचांग - शनिवार : आश्‍विन शुद्ध १४, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी कुंभ/मीन, चंद्रोदय सायंकाळी ५.२९, चंद्रास्त पहाटे ५.४५, सूर्योदय ६.२७, सूर्यास्त ६.१६, पौर्णिमा प्रारंभ, उ. रात्री ३.४३, भारतीय सौर आश्‍विन १६ शके १९४४.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 8 ऑक्टोबर 2022

पंचांग -

शनिवार : आश्‍विन शुद्ध १४, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी कुंभ/मीन, चंद्रोदय सायंकाळी ५.२९, चंद्रास्त पहाटे ५.४५, सूर्योदय ६.२७, सूर्यास्त ६.१६, पौर्णिमा प्रारंभ, उ. रात्री ३.४३, भारतीय सौर आश्‍विन १६ शके १९४४.

दिनविशेष -

  • २००३ - अमेरिकेतील अर्थतज्ज्ञ रॉबर्ट एंजल आणि इंलंडचे क्‍लाईव्ह ग्रेंजर यांना आर्थिक क्षेत्रातील नोबेल जाहीर.

  • २००४ - केनियातील "ग्रीन बेल्ट मूव्हमेंट''च्या प्रणेत्या व पर्यावरण उपमंत्री वनगारी मथाई यांना शांततेसाठीचा नोबेल जाहीर. आफ्रिका खंडातील महिलेला प्रथमच हा बहुमान मिळाला आहे.

  • २००९ - रुमानियात जन्मलेल्या जर्मनीच्या हार्टा म्युलर यांना साहित्याचे नोबेल जाहीर.

  • २०१४ - सूक्ष्मदर्शीमधून पूर्वीपेक्षा अधिक प्रभावीपणे सखोल स्वरूपात निरीक्षण करता येण्याची नवी पद्धत विकसित केल्याबद्दल अमेरिकेच्या एरिक बेटझिंग, विल्यम मॉर्नर आणि जर्मनीच्या स्टीफन हेल या शास्त्रज्ञांना नोबेल जाहीर.