आजचे पंचांग आणि दिनविशेष - 27 ऑक्टोबर 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 27 ऑक्टोबर 2022

पंचांग -

गुरुवार : 17, कार्तिक शुक्ल पक्ष, द्वितीया 2079 राक्षस, विक्रम संवता चंद्रदर्शन, विंचूडो, सर्वार्थ सिद्धी योग, आदल योग, विदाल योग शके १९४४.

दिनविशेष -

२००४ : संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या मध्यम पल्ल्याच्या पृथ्वी-३ या क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे यशस्वी चाचणी.

२०१० : मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना ‘लिबेरा पीपल्स चॉइस’चा आशियायी पुरस्कार लंडन येथे प्रदान.

२०१४ : इन्चॉन येथे झालेल्या आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धेत कर्नाटकचा जलतरणपटू शरथ गायकवाड याने सहा पदके जिंकून भारतीय क्रीडा क्षेत्रात इतिहास घडविला.

२०१४ : कोल्हापूरचा अपंग जलतरणपटू स्वप्नील पाटील याने आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धेत ब्रॉँझपदक जिंकले.