Read Today's Panchang todays happened Rashi bhavishya in marathi langauge | Daily Horoscope - 2 January 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

daily panchang horoscope and happened
आजचे पंचांग, दिनविशेष आणि दिनमान - 02 जानेवारी 2022

आजचे पंचांग, दिनविशेष आणि दिनमान - 02 जानेवारी 2022

पंचांग -

रविवार : मार्गशीर्ष कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, चंद्रोदय स. ७.३७, चंद्रास्त सायं. ५.४५, सूर्योदय ७.०८, सूर्यास्त ६.०८, दर्शवेळा अमावास्या, अमावास्या प्रारंभ प. ३.४२, अमावास्या समाप्ती उ. रा. १२.०४, भारतीय सौर पौष १२ शके १९४३.

दिनविशेष -

१९९८ - ज्येष्ठ साहित्यिका डॉ. सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी.लिट. प्रदान.

२००० - पनामा सरकारने सुमारे ८५ वर्षांच्या खंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.

२००० - संत ज्ञानेश्वरांच्या स्मरणार्थ त्यांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.

२००२ - जम्मू-काश्‍मीर विधानसभेच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर अतिरेक्‍यांनी घडवून आणलेल्या शक्तिशाली बाँबस्फोटात १ पोलिस ठार, तर २२ जण जखमी झाले.

२०१२ - आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार संघटनेच्या (एआयपीएस) वतीने २०११ चा ‘फेअर प्ले’चा पुरस्कार भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला जाहीर. हा पुरस्कार मिळविणारा धोनी हा पहिलाच क्रिकेटपटू.

दिनमान -

मेष : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरुकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. आरोग्याच्या तक्रारी येतील.

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

कर्क : सहकार्याची अपेक्षा नको. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

सिंह : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींची वैचारिक प्रगती होईल.

कन्या : प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. काहींना प्रवासाचे योग येतील.

तूळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

वृश्‍चिक : व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणाल. आर्थिक लाभ होतील.

धनू : शासकीय कामे मार्गी लागतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

मकर : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

कुंभ : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल. जिद्द वाढेल.

मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. मनोबल वाढेल.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top